
UAE Womens Used Retired Out Tactic: तब्बल 148 वर्षांचा इतिहास असलेल्या क्रिकेटच्या मैदानावर अनेक चकित करणाऱ्या गोष्टी घडत असतात. आयसीसी महिला टी20 विश्वचषक 2026 पात्रता फेरीच्या आशिया विभागाच्या (ICC Womens T20 World Cup 2025 Qualifier Asia Region) युएई महिला विरूद्ध कतार महिला (UAE Womens v Qatar Womens) सामन्यात अशीच एक जगावेगळी घटना पाहायला मिळाली. युएई संघाच्या सर्व फलंदाज रिटायर्ड आऊट (Retired Out) झाल्यानंतरही संघाने 163 धावांनी विजय साजरा केला.
A unique tactic from UAE at the Women's #T20WorldCup Asia Qualifier with 10 batters 'Retired Out' in a massive 163-run victory 😲
Check how it all transpired 👇https://t.co/mA95gYToQE
— ICC (@ICC) May 10, 2025
UAE Womens Used Retired Out Tactic
नऊ संघांच्या या स्पर्धत सुपर 3 फेरीत जाण्यासाठी युएई संघाला विजय हवा होता. प्रथम फलंदाजीची संधी मिळाल्यानंतर कर्णधार ईशा ओझा (Esha Oza) हिने तिर्था सतिशसह पहिल्याच विकेटसाठी 16 षटकांमध्ये बिनबाद 192 धावा केल्या. ईशाने 55 चेंडूवर 14 चौकार व 5 षटकारांच्या मदतीने नाबाद 113 धावा केल्या. तर, तिर्थाने 43 चेंडूवर नाबाद 74 धावा ठोकल्या.
त्याचवेळी मैदानावर काळे ढग जमा झाल्याने पावसाची शक्यता वर्तवली गेली. तेव्हा युएई संघाने अजब निर्णय घेतला. ईशा व तिर्था यांनी रिटायर्ड आऊट होत पव्हेलियनचा रस्ता धरला. त्यानंतर येणाऱ्या प्रत्येक फलंदाजाने फक्त खेळपट्टीवर उभे राहण्याचा निर्णय घेतला आणि एकही चेंडू न खेळता लगेच स्वतःला रिटायर्ड आऊट घोषित केले. अशाप्रकारे त्यांचे सर्व 10 बळी रिटायर्ड आऊट पद्धतीने पडले. त्यातील आठ फलंदाज खाता खोलू शकले नाहीत. टी20 क्रिकेटमध्ये डाव घोषित करण्याची परवानगी नसल्याने, संघाने अशा प्रकारे युक्ती लढवली.
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
त्यानंतर कतार संघाची फलंदाजी आल्यावर त्यांचा डाव 11.1 षटकात 29 धावांवर संपुष्टात आणला. त्यासह त्यांनी 163 धावांनी मोठा विजय साजरा केला. तसेच एका सामन्यात सर्वाधिक 15 खेळाडू शून्यावर बाद होण्याचा विक्रमही या सामन्यात नोंदला गेला. युएई संघाच्या या निर्णयाचे कौतुक सर्वत्र होत आहे.
UAE Womens Used Retired Out Tactic
हे देखील वाचा- दोन सामन्यासाठी राजस्थानने बोलावलेला Lhuan dre Pretorius आहे कोण ? वय 19 आणि थेट जेसी रायडरशी तुलना