
Varun Chakravarthy Redemption: चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (Champions Trophy 2025) चे विजेतेपद भारतीय संघाने पटकावले. रोहित शर्मा याच्या नेतृत्वातील संघाने तिसऱ्यांदा ही मानाची स्पर्धा जिंकली. भारतीय संघाच्या यशात फिरकीपटू वरूण चक्रवर्ती (Varun Chakravarthy) याचे मोठे योगदान राहिले. ज्या दुबईच्या मैदानावर 2020 मध्ये त्याला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले होते, त्याच मैदानावर त्याने भारताचा या स्पर्धेतील सर्वात मोठा मॅचविनर होण्याचा मान मिळवला.
Varun Chakravarthy Redemption In Champions Trophy 2025
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी भारतीय संघाची घोषणा झाली त्यावेळी वरूण याचे नाव त्या संघात नव्हते. मात्र, जसप्रीत बुमराह दुखापतग्रस्त झाल्याने वरूण याला संघात संधी मिळाली. वेगवान गोलंदाजाच्या जागी फिरकीपटूला संधी दिल्याने संघ व्यवस्थापन व निवड समितीवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती. परंतु, कर्णधार रोहित शर्मा याने संघात पाच फिरकीपटूंना निवडण्याच्या निर्णयाचे समर्थन केले.
स्पर्धेच्या पहिल्या दोन सामन्यात वरूण याला बाकावर बसवण्यात आले. तिसऱ्या व अखेरच्या साखळी सामन्यात त्याला संधी मिळाली. त्याने आपल्या पहिल्याच सामन्यात 42 धावा देत पाच बळी मिळवून जबरदस्त चॅम्पियन्स ट्रॉफी पदार्पण केले. त्यानंतर उपांत्य सामन्यात त्याच्याकडून पुन्हा एकदा अपेक्षा होत्या. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या सामन्यात भारतासमोर सर्वात मोठे आव्हान आक्रमक सलामीवीर ट्रेविस हेड याचे होते. वरुण याने आपल्या दुसऱ्याच चेंडूवर त्याला तंबूचा रस्ता दाखवत भारताला सर्वात मोठे यश मिळवून दिले. त्या सामन्यातही त्याला दोन बळी मिळाले.
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
सर्वात महत्त्वाच्या अंतिम सामन्यात विल यंग याला बाद करून त्याने भारताला दरवाजे खुले करून दिले. त्यानंतर चांगली भागीदारी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या ग्लेन फिलिप्स याचा देखील त्याने त्रिफळा उडवला. यासह फक्त तीन सामन्यात नऊ बळी घेत तो दुसरा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला.
वरूण याने 2020 मध्ये याच दुबईच्या मैदानावर भारतासाठी टी20 विश्वचषक खेळला होता. मात्र, दोन सामने खेळल्यानंतरही त्याला एकही बळी मिळाला नव्हता. यानंतर त्याच्यावर जोरदार टीका झालेली. तसेच, तो पुन्हा भारतीय संघासाठी खेळेल याबाबत शंका उपस्थित केली जात होती. मात्र, त्याने या सर्व प्रश्नांची उत्तरे देत भारताचा पद्धतीने सर्वात मोठा मॅचविनर होण्याचा मान मिळवला.
(Varun Chakravarthy Redemption In Champions Trophy 2025)
One comment
Pingback: Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score ।