Breaking News

चॅम्पियन्स बनलो रे! टीम इंडियाने उंचावली Champions Trophy 2025, रोहित-अक्षर विजयाचे शिल्पकार

CHAMPIONS TROPHY 2025
Photo Courtesy: X/BCCI

Rohit Sharma 100 In Champions Trophy 2025 Final: भारत आणि न्यूझीलंड (IND v NZ) यांच्या दरम्यान खेळल्या गेलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 अंतिम सामन्यात (Champions Trophy 2025 Final) भारतीय संघ विजेता ठरला. भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने झळकावलेले शानदार अर्धशतक व श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेल त्यांच्या खेळ्या भारताच्या विजयाचे वैशिष्ट्य ठरले. यासह भारतीय संघाने सर्वाधिक तीन वेळा चॅम्पियन्स ट्रॉफी (Champions Trophy जिंकण्याचा कारनामा केला.

India Won Champions Trophy 2025

विजयासाठी मिळालेल्या 252 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित व शुबमन गिल यांनी संघाला शतकी सलामी दिली. रोहितने स्पर्धेतील आपले पहिले अर्धशतक यादरम्यान पूर्ण केले. त्यानंतर त्याने काहीसा सावध पवित्रा घेतला. मात्र, त्यानंतर अवघ्या काही शकतात भारताचे तीन बळी गेले. यानंतर श्रेयस अय्यर व अक्षर पटेल यांनी दमदार भागीदारी करत संघाला विजयाच्या दिशेने नेले. श्रेयस 48 धावा करून बाद झाला‌. त्यानंतर अक्षर याने केएल राहुल याला साथीला घेत डाव पुढे नेला.

विजयासाठी 49 धावांची गरज असताना अक्षर तंबूत परतला. त्यानंतर राहुल याने हार्दिक पंड्या याच्यासोबत भारताला विजयाचा समीप नेले. विजयासाठी 11 धावांची गरज असताना हार्दिक बाद झाला. अखेर राहुल व जडेजा यांनी संघाला विजयाच्या पार नेले.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप 

(India Won Champions Trophy 2025)

वेळ बदलतेच! त्या अपमानानंतर Varun Chakravarthy ची फिनिक्स भरारी, Champions Trophy 2025 चा बनला ‘डॉन’