Breaking News

ICC Rankings मध्ये भारतीयांची बल्ले-बल्ले! रोहित-विराटला हटवत हा ‘फ्युचर सुपरस्टार’ टॉप 10 मध्ये, जस्सीही जोमात

ICC RANKINGS
Photo Courtesy: X/ICC

ICC Rankings: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीने (ICC) नवी क्रमवारी जाहीर केली आहे. यातील फलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय फलंदाजांनी पुन्हा एकदा वर्चस्व राखल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे दोन प्रकारातील क्रमवारीत अव्वल दहामध्ये भारताचा एकमेव फलंदाज यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) हा आहे.

या नव्या क्रमवारीत कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत भारताचे तीन फलंदाज दिसून येतात. कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) हा सहाव्या स्थानी आहे. तर यशस्वी आठव्या व विराट कोहली (Virat Kohli) दहाव्या स्थानी दिसून येतो. या व्यतिरिक्त शुबमन गिल याने देखील 19 वे स्थान राखले आहे. कसोटी क्रमवारीत न्यूझीलंडचा केन विल्यम्सन याने आपले पहिले स्थान अबाधित राखले आहे.

वनडे फलंदाजांच्या क्रमवारीत पहिल्या स्थानी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम दिसून येतो. त्यानंतर दुसऱ्या, तिसऱ्या व चौथ्या स्थानी अनुक्रमे शुबमन गिल, विराट कोहली व रोहित शर्मा हे आहेत. सध्या संघ बाहेर असलेला श्रेयस अय्यर हा अजूनही पहिल्या 12 मध्ये आपले स्थान टिकवून आहे.

फलंदाजांच्या टी20 क्रमवारीचा विचार केल्यास, भारताचा पुढील टी20 कर्णधार म्हणून चर्चा होत असलेला सूर्यकुमार यादव हा ट्रेविस हेडनंतर दुसऱ्या स्थानी विराजमान आहे ‌ झिम्बाब्वेविरूद्ध शानदार कामगिरी केलेला यशस्वी जयस्वाल सहाव्या व ऋतुराज गायकवाड आठव्या क्रमांकावर दिसून येतो.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप 

गोलंदाजांच्या कसोटी क्रमवारीत भारताचा रविचंद्रन अश्विन पहिल्या, जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) तिसऱ्या व रवींद्र जडेजा सातव्या क्रमांकावर आहे. वनडे गोलंदाजी क्रमवारी मोहम्मद सिराज चौथ्या, जसप्रीत बुमराह पाचव्या आणि कुलदीप यादव सातव्या स्थानी विराजमान आहे. विशेष म्हणजे टी20 गोलंदाजी क्रमवारीत पहिल्या दहा मध्ये एकही भारतीय नाही.

(Weekly ICC Rankings Update Jaiswal Bumrah Rule)

Rohit Virat बद्दल हे काय बोलून गेले कपिल देव? धोनीचे उदाहरण देत म्हणाले…