
Who Is Rajal Arora? सध्या भारतीय क्रिकेट संघ युएसए व वेस्ट इंडिज येथे टी20 विश्वचषक (T20 World Cup 2024) खेळत आहे. भारतीय संघासह एक मोठा सपोर्ट स्टाफ देखील तिथे उपस्थित दिसतो. मात्र, या सपोर्ट स्टाफमध्ये एक महिला सातत्याने दिसून येत असते. ती महिला नक्की कोण आहे? याविषयी आपण जाणून घेणार आहोत.
A fruitful few days in NYC!
An exciting collaboration with @NFL.
Extremely grateful for the opportunity to execute this beautiful amalgamation between two sporting icons.#TeamIndia #NFL | @Moulinparikh pic.twitter.com/jsqj6OXAex
— Rajal Arora (@RajalArora) June 13, 2024
जवळपास 30 जणांच्या भारतीय संघासोबत असलेली ती एकमेव महिला सदस्य आहे राजल अरोरा (Rajal Arora). राजल ही डिजिटल आणि मीडिया मॅनेजर म्हणून भारतीय संघासोबत असते. विशेष म्हणजे मागील जवळपास 9 वर्षांपासून ती भारतीय संघासोबत आहे. सोशल मीडिया मॅनेजर असण्यासोबतच ती बीसीसीआयच्या अंतर्गत तक्रार निवारण समितीची प्रमुख देखील असून, गैरवर्तन केलेल्या खेळाडूंच्या प्रकरणात ती देखरेख करत असते.
राजल हिने सिम्बॉयसिस इन्स्टिट्यूट ऑफ मीडिया अँड कम्युनिकेशन, पुणे येथून आपले शिक्षण पूर्ण केले होते. तसेच ती महाराष्ट्रातील अग्रगण्य मानल्या जाणाऱ्या सकाळ वृत्त समूहात देखील जवळपास दोन वर्ष काम करत होती.
राजल हीने शालेय जीवनात नेमबाजी व बास्केटबॉल यांसारखे खेळ देखील खेळले आहेत. भारतीय संघातील केएल राहुल, दिनेश कार्तिक व ईशांत शर्मा यांसारख्या खेळाडूंशी व त्यांच्या कुटुंबाशी तीचे चांगले संबंध असल्याचे सोशल मीडिया पोस्टवरून कळते.
(Who Is Rajal Arora Only Lady In Team India Support Staff)
USA Vs IRE: पाऊस थांबूनही का होऊ शकला नाही सामना? खेळाचे नियम काय सांगतात? वाचा