
Wimbledon 2025 Semi Final: वर्षातील तिसरी आणि सर्वात मानाची ग्रँडस्लॅम स्पर्धा असलेल्या विम्बल्डनच्या पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीतील लढती ठरल्या आहेत. शुक्रवारी उपांत्य फेरीचा या दोन्ही लढती खेळल्या जातील. स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (13 जुलै) सेंटर कोर्ट येथे होईल.
All eyes on the Gentlemen’s Singles Trophy 🏆#Wimbledon pic.twitter.com/hhtQ8lB2oD
— Wimbledon (@Wimbledon) July 9, 2025
Wimbledon 2025 Semi Final
जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर असलेल्या जानिक सिन्नर (Janik Sinner) याने अमेरिकेच्या बेन शिल्टन याला सरळ सेटमध्ये पराभूत करत उपांत्य फेरीत जागा बनवली. तर दुसऱ्या क्रमांकावरील कार्लोस अल्कारेझ (Carlos Alcaraz) याने ब्रिटनच्या कॅमरुन नोरी याला देखील सरळ सेट मध्ये सहज पराभूत केले. आपल्या 25 व्या ग्रँडस्लॅमच्या शोधात असलेला सार्बियाचा नोवाक जोकोविच (Novak Djokovic) व अमेरिकेचा युवा टेलर फ्रित्झ यांना विजयासाठी संघर्ष करावा लागला. मात्र, अखेर त्यांनी उपांत्य फेरीतील आपली जागा निश्चित केली.
पहिल्या उपांत्य सामन्यात सिन्नर व जोकोविच ही जोडी भिडेल. तर, दुसऱ्या उपांत्य सामन्यात अल्कारेझ याच्यापुढे फ्रित्झचे तगडे आव्हान असणार आहे. अल्कारेझ फ्रेंच ओपन पाठोपाठ विम्बल्डन विजेतेपदाची देखील हॅट्रिक करण्यासाठी उत्सुक असेल.
महिला एकेरीच्या उपांत्य सामन्यात अव्वल मानांकित एरिना सबालेंका ही तेराव्या मानांकित अमांडा अनिसिमोवा हिचे आव्हान स्वीकारेल. तर, आठव्या मानांकित इगा स्वियाटेक हिला बिगरमानांकित बेलिंडा बेंकिक आव्हान देईल.
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
हे देखील वाचा: Wimbledon 2025 च्या विजेत्यावर पैशाचा पाऊस, मिळणार आयपीएल विजेत्यांपेक्षाही तगडी रक्कम