
Womens Kabaddi World Cup 2025: भारताने बांगलादेश येथे सुरू झालेल्या दुसऱ्या महिला कबड्डी विश्वचषक स्पर्धेत सलग तिसरा साखळी विजय मिळविताना जर्मनीला 63-22 असे नमविले. या विजयाने भारताचा उपांत्य फेरी गाठण्याचा मार्ग मोकळा झाला. भारताची शेवटची साखळी लढत युगांडाशी होईल.
Womens Kabaddi World Cup 2025 India Won 3rd
आक्रमक सुरुवात करत भारताने तिसऱ्या मिनिटाला लोण देत 9-0 अशी आघाडी घेतली. पुन्हा 9 व्या मिनिटाला लोण देत आपली आघाडी 23-5 अशी वाढविली. पुन्हा 14 व्या मिनिटाला तिसरा लोण देत आपली आघाडी 33-8 अशी वाढविली. मध्यंतराला 35-9 अशी आघाडी भारताकडे होती. उत्तरार्धात सावध खेळ करीत मध्यांतरानंतर चौथ्या मिनिटाला आणखी एक लोण देत आपली आघाडी 45-12 अशी भक्कम केली. तर पाचवा लोण 8 व्या मिनिटाला देत 55-16 अशी आघाडी वाढविली.
It’s 3️⃣ in 3️⃣ for the defending champions at the Women’s Kabaddi World Cup 2025 💪 #WKWC25 #KabaddiWorldCup2025 pic.twitter.com/NC1kmFlZ0Q
— ProKabaddi (@ProKabaddi) November 20, 2025
आज भारताने संजुदेवी, पुष्पा, पूजा यांना आराम दिला. पाचव्या मिनिटाला सोनालीला देखील विश्रांती दिली. अंजुने या सामन्यात 19 चढाया केल्या. तिने 8 बोनस व 15 झटापटीचे असे एकूण 23 गुण घेतले. मिनीने 10 चढाया 1 बोनस व 5 गुण घेतले. 13 नंबरच्या खेळाडूने 5 चढाया करीत 3 बोनस व 2 गुण घेत आपलाही खारीचा वाटा उचलला. भारतापुढे जर्मनीचा संघ अगदीच दुबळा वाटला.
Latest Sports News In Marathi
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
हे देखील वाचा: भारतीय महिलांचा सलग दुसरा विजय, यजमान बांगलादेशचा उडवला धुव्वा
kridacafe
One comment
Pingback: Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score ।