Breaking News

कुस्तीक्षेत्रात खळबळ! महाराष्ट्र केसरी Sikandar Shaikh ला पंजाबमध्ये अटक, वाचा बातमी

sikandar shaikh
Photo Courtesy: X

Wrestler Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी विजेता कुस्तीपटू सिकंदर शेखला (Sikandar shaikh) पंजाब पोलिसांनी अटक केली आहे. अवैध शस्त्र तस्करी प्रकरणात सिंकदर याचा सहभाग असल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणामुळे देशाच्या कुस्तीक्षेत्रात खळबळ उडाली आहे.

Wrestler Sikandar Shaikh Arrested

प्राथमिक माहितीनुसार, राजस्थानमधील पपला गुर्जर टोळीशी त्याचा संबंध असल्याचे पोलिस तपासातून समोर आल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. दरम्यान, याप्रकरणी सिकंदरच्या कुटुंबीयांनी बोलण्यास नकार दिला असून खोट्या गुन्ह्यात आमच्या मुलाला अडकवले जात असल्याचे त्यांनी म्हटले.

सिकंदरच्या अटकेनंतर राज्याच्या कुस्ती क्षेत्रात देखील चर्चांना उधाण आलं आहे. सिकंदरच्या बाजुने आणि विरोधातही प्रतिक्रिया उमटत आहेत. याप्रकरणी, लवकरच अधिक माहिती समोर येईल.

Latest Sports News In Marathi

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

हे देखील वाचा: दबंग दिल्ली बनली PKL 12 ची चॅम्पियन! पुणेरी पलटणचे दुसऱ्या विजेतेपदाचे स्वप्न भंग