
WTC 2025-2027 India Schedule: जागतिक कसोटी चॅम्पियनशिपची 2023-2025 ही सायकल नुकतीच समाप्त झाली. दक्षिण आफ्रिकेने अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभूत करत ही मानाची गदा जिंकली. त्यानंतर आता डब्लूटीसी 2025-2027 या सायकलला सुरुवात होत आहे. या नव्या सायकलमध्ये भारतीय संघ कोणाविरुद्ध खेळणार यावर एक नजर टाकूया.
WTC 2025-2027 India Schedule
नव्या सायकलची सुरुवात भारतीय संघाच्या इंग्लंड दौऱ्याने होईल. भारत 20 जूनपासून इंग्लंडमध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळेल. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी वेस्ट इंडिज संघ भारतात दाखल होईल. नोव्हेंबर महिन्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतीय दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात उभय संघांमध्ये दोन सामन्यांची कसोटी मालिका होईल.
🚨 WTC 2027 BEGINS ON JUNE 17, TUESDAY 🚨 pic.twitter.com/wPiNnUWvnL
— Johns. (@CricCrazyJohns) June 14, 2025
भारतीय संघाला आपला पुढील सामना थेट ऑगस्ट 2026 मध्ये खेळायला मिळेल. भारतीय संघ श्रीलंकेचा दौरा करणार असून, यामध्ये दोन कसोटी सामने समाविष्ट आहे. तर, त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारताला न्यूझीलंडमध्ये दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळावी लागेल. भारतीय संघाची या सायकलमधील अखेरची मालिका मायदेशात जानेवारी-फेब्रुवारी 2027 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध होईल. यामध्ये एकूण पाच कसोटी सामने खेळले जातील. भारतीय संघ संपूर्ण सायकलमध्ये 18 कसोटी सामने खेळेल. अव्वल दोन स्थानी राहिलेल्या संघांना जून 2027 मध्ये अंतिम सामना खेळण्याची संधी मिळेल.
WTC 2025-2027 Team India Schedule
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
हे देखील वाचा: या आहेत 2031 पर्यंतच्या ICC Tournaments! तिघांचे यजमानपद भारताकडे