
WTC Final 2025 Day 3: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप म्हणजेच डब्ल्यूटीसी फायनल 2025 (WTC Final 2025) च्या तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका (AUSvSA) या दोन्ही संघांनी प्रयत्नांची शर्थ केली. कर्णधार टेंबा बवुमा (,Temba Bavuma) व ऐडन मार्करम (Aiden Markram) यांनी अशक्यप्राय वाटणाऱ्या 282 धावांकडे नेटाने वाटचाल सुरू ठेवली आहे. मार्करमचे लाजवाब शतक तिसऱ्या दिवसाचे वैशिष्ट्य ठरले.
WTC Final 2025 Day 3 Updates
दुसऱ्या दिवशीच्या खेळानंतर 218 धावांची आघाडी घेऊन गेलेल्या ऑस्ट्रेलियाची सुरुवात तिसऱ्या दिवशी खराब झाली. धावसंख्येत केवळ चारची भर पडलेली असताना नॅथन लायन बाद झाला. मात्र, त्यानंतर मिचेल स्टार्क (Mitchell Starc) व जोश हेझलवूड यांनी 11 व्या गड्यासाठी भागीदारी बनवायला सुरुवात केली. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना थकवत त्यांनी तब्बल 23 षटके खेळून काढत 59 धावा केल्या. स्टार्कने नाबाद 58 धावा केल्या. हेझलवूडला बाद करताच ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 207 धावांवर समाप्त झाला. दक्षिण आफ्रिकेसाठी रबाडाने सर्वाधिक 4 बळी मिळवले.
चॅम्पियनशिप जिंकण्यासाठी 282 धावांचे आव्हान मिळाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेची सुरुवात निराशाजनक झाली. रियान रिकलटन केवळ सहा धावा काढून बाद झाला. त्यानंतर मार्करम व विहान मलडर यांनी ऑस्ट्रेलियन यश मिळवण्यासाठी झगडवले. दोघांनी दुसऱ्या गड्यासाठी 61 धावा जोडल्या. मलडर याने 27 धावांचे योगदान दिले. त्याला देखील स्टार्कने बाद केले.
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
मलडर बाद झाल्यानंतर मार्करम याच्या साथीला कर्णधार टेंबा बवुमा आला. बवुमा दोन धावांवर असताना स्टीव्ह स्मिथ या नेत्याचा झेल सोडला. याच घडामोडीत स्मिथच्या करंगळीला गंभीर दुखापत झाली आणि त्याला मैदान सोडून जावे लागले. त्यानंतर कर्णधार व उपकर्णधाराच्या या जोडीने ऑस्ट्रेलियाला सामन्यातून बाहेर करणारी भागीदारी केली. दोघांनीही अर्धशतके पूर्ण करत संघाला 200 पार नेले.
दिवसातील शेवटून दुसऱ्या षटकात एक शानदार चौकार मारत मार्करम याने 156 चेंडूमध्ये शतक पूर्ण केले. आयसीसी स्पर्धेच्या अंतिम सामने शतक करणारा दक्षिण आफ्रिकेचा तो पहिला फलंदाज बनला. त्यानंतर दिवसाचा खेळ संपला तेव्हा मार्करम 102 व बवुमा 65 धावा काढून नाबाद आहेत. सामन्याच्या चौथ्या दिवशी त्यांना विजयासाठी केवळ 69 धावा हव्या आहेत.
WTC Final 2025 Day 3 Updates
हे देखील वाचा: WTC Final 2025 Day 1: पहिला दिवस ऑस्ट्रेलियाचा! वेबस्टर-स्मिथनंतर गोलंदाजांची कमाल
WTC Final 2025 Day 2: दुसऱ्या दिवशीच सामना रंगतदार अवस्थेत, ऑस्ट्रेलियाचे पारडे किंचित जड
One comment
Pingback: Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score ।