
Yashasvi Jaiswal Against England In Test Cricket : इंग्लंड आणि भारत (ENG vs IND) यांच्यातील दुसरा कसोटी सामना एजबॅस्टन येथे खेळला जात आहे. भारतीय संघाला या सामन्याच्या पहिल्या दिवशी फलंदाजासाठी आमंत्रण मिळाले होते. हे आमंत्रण स्वीकारत भारताचा युवा सलामीवीर यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) याने शानदार फलंदाजी केली. दौऱ्यावरील आपल्या सलग दुसऱ्या शतकापासून तो 13 धावांनी दूर राहिला. मात्र, असे असले तरी त्याने इंग्लंडविरुद्ध आपले वर्चस्व कायम ठेवले.
Yashasvi Jaiswal Against England In Test Cricket
भारतीय संघाला फलंदाजीचे आमंत्रण मिळाल्यावर केएल राहुल स्वस्तात तंबूत परतला. मात्र, त्यानंतर यशस्वी व करूण नायर यांनी केवळ 90 चेंडूत 80 धावांची वेगवान भागीदारी केली. यादरम्यान यशस्वी याने आपले अकरावे अर्धशतक पूर्ण केले. दुसऱ्या सत्राचा खेळ सुरू झाल्यानंतर यशस्वीने काहीसा संयम साधला. त्यामुळेच बेन स्टोक्सच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूवर तो यष्टीरक्षकाकडे झेल देऊन बाद झाला. बाद होण्यापूर्वी त्याने 107 चेंडूंमध्ये 13 चौकारांच्या मदतीने 87 धावा केल्या.
यशस्वी इंग्लंडविरुद्ध आतापर्यंत 7 कसोटी सामने खेळला आहे. यामध्ये त्याने 12 डावांमध्ये फलंदाजी केली. यामध्ये त्याने 82.18 अशा जबरदस्त सरासरीने 904 धावा केल्या आहेत. यामध्ये चार अर्धशतकांचा समावेश आहे. तर, त्याच्या बॅटमधून एक शतक व दोन द्विशतके देखील आली आहेत. जयस्वाल या मालिकेत आणखी जास्तीत जास्त 7 डाव खेळू शकतो. यामध्ये त्याच्याकडे ही आकडेवारी आणखी मोठी करण्याची संधी असेल.
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
हे देखील वाचा: ENG vs IND Edgbaston Test: इंग्लंडचा नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय, भारतीय संघात तब्बल 3 बदल