
IPL 2024 Qualifier 1| आयपीएल 2024 च्या प्ले ऑफ्स सामना मंगळवारी (21 मे) सुरुवात झाली. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील या सामन्यात कोलकाताच्या गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी करत सनरायझर्स हैदराबादला 159 धावांवर रोखले. मिचेल स्टार्क व सुनील नरीन यांनी बहारदार गोलंदाजी करत आपल्या संघाला या सामन्यात पुढे नेले. हैदराबादसाठी केवळ राहुल त्रिपाठी व पॅट कमिन्स यांनी झुंज दिली.
KOLKATA KNIGHT RIDERS NEEDS 160 RUNS TO QUALIFY INTO THE FINAL….!!!! 🏆 pic.twitter.com/O9FWTw3mtq
— Johns. (@CricCrazyJohns) May 21, 2024
नरेंद्र मोदी स्टेडियम येथे झालेल्या या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्स याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, त्याचा हा निर्णय चुकीचा ठरला. दुसऱ्या चेंडूवर सर्वाधिक धावा बनवणारा ट्रेविस हेड खाते ही न खोलता तंबूत परतला. दुसरा सलामीवीर अभिषेक शर्मा हा देखील 3 धावांच्या पुढे जाऊ शकला नाही. मिचेल स्टार्कने पाचव्या षटकात नितिश रेड्डी व शहाबाज अहमद यांना लागोपाठ बाद करत हैदराबादची अवस्था 4 बाद 39 अशी केली.
पाचव्या गड्यासाठी राहुल त्रिपाठी व हेन्रिक क्लासेन यांनी 62 धावांची भागीदारी करत सामन्यात रंग भरला. मात्र, क्लासेन मोठा फटका खेळण्याच्या नादात 32 धावा करून बाद झाला. दुसऱ्या बाजूने त्रिपाठीने स्पर्धेतील आपले पहिले अर्धशतक पूर्ण केले. मात्र, तो आणि इम्पॅक्ट प्लेयर सनवीर लागोपाठ तंबूत परतले. अखेरच्या टप्प्यात कर्णधार पॅट कमिन्स याने 30 धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यामुळे संघ 159 पर्यंत पोहोचू शकला. केकेआरसाठी स्टार्कने 3 बळी मिळवले. तर, चक्रवर्ती याने दोन बळी टिपले.
(IPL 2024 Qualifier 1 KKR Restrict SRH On 159 Starc Narine Shines)