![ipl 2024](https://kridacafe.com/wp-content/uploads/2024/05/ipl-2024-rajasthsan-royals.jpg)
आयपीएल 2024 (IPL 2024) मधील एलिमिनेटरचा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध आरसीबी (RRvRCB) असा खेळला गेला. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात प्रेक्षकांना अनेक चढउतार पाहायला मिळाले. अखेर राजस्थान रॉयल्सने संयम दाखवत सामना खिशात घातला. या एलिमिनेटर सामन्यात विजय मिळवल्याने राजस्थान रॉयल्स आता दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात सनरायझर्स हैदराबादविरुद्ध भिडेल.
All is 𝙒𝙚𝙡𝙡 when Po𝙒𝙚𝙡𝙡 is there 😎
Rajasthan Royals ease out the nerves with a 4️⃣ wicket victory 🩷
With that, they move forward in the quest for glory 🙌
Watch the match LIVE on @StarSportsIndia and @JioCinema 💻📱#TATAIPL | #RRvRCB | #Eliminator | #TheFinalCall pic.twitter.com/brrzI8Q3sZ
— IndianPremierLeague (@IPL) May 22, 2024
करो अथवा मरो या स्थितीतील या सामन्यात राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. ट्रेंट बोल्ट व संदीप शर्मा या जोडीने पहिल्या पावर प्लेमध्ये जबरदस्त गोलंदाजी करताना आरसीबीला जखडून ठेवले. त्यांनी त्यांची सलामी जोडी फाफ डू प्लेसिस व विराट कोहली यांना बाद करण्यात त्यांना यश आले. रविचंद्रन अश्विन याने आपल्या अनुभवाचा फायदा उठवत कॅमेरून ग्रीन व मॅक्सवेल यांना पाठोपाठ बात करत आरसीबीला संकटत ढकलले. रजत पाटीदार व महिपाल लओमरओर यांनी काहीसा संघर्ष केल्याने त्यांना 172 पर्यंत मजल मारता आली.
या धावांचा पाठलाग करताना राजस्थानला यशस्वी जयस्वाल व टॉम कोहलर-कॅडमोर यांनी सावध सुरुवात केली. त्यानंतर जयस्वाल व संजू सॅमसन यांनी देखील भागीदारी करत संघाचे फारसे नुकसान होऊ दिले नाही. मात्र, ते दोघे लागोपाठ तंबूत परतल्याने राजस्थान सामन्यात काहीसी पिछडली. त्यानंतर जुरेल व रियान पराग यांनी उत्कृष्ट खेळ करत सामना फार दूर जाऊ दिला नाही. परागने आपल्या प्रतिभेचे दर्शन पुन्हा घडवत शानदार 36 धावांची खेळी केली. त्यानंतर हेटमायर व पॉवेल या कॅरेबियन जोडीने राजस्थानचा विजय निश्चित केला.
(IPL 2024: Rajasthan Royals Beat RCB In Eliminator Secure Place In Qualifier 2)