
Harry Brook 300: पाकिस्तान आणि इंग्लंड (PAK v ENG) यांच्या दरम्यान खेळला जात असलेल्या मुलतान कसोटीच्या (Multan Test) चौथ्या दिवशी इंग्लंडने ऐतिहासिक मजल मारली. युवा हॅरी ब्रूक (Harry Brook) याने आपल्या कारकिर्दीतील पहिले त्रिशतक पूर्ण केले. तसेच अनुभवी जो रूट (Joe Root Double Century) याने 262 धावांची खेळी केली.
Simply incredible 🙌
Our sixth Test triple centurion 👏
Match Centre: https://t.co/M5mJLlHALN
🇵🇰 #PAKvENG 🏴 | #EnglandCricket pic.twitter.com/TtlIKWdbhs
— England Cricket (@englandcricket) October 10, 2024
फलंदाजांसाठी अक्षरशा नंदनवन असलेल्या या खेळपट्टीवर पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 556 धावा उभ्या केल्या. या धावांना उत्तर देताना इंग्लंडसाठी आधी बेन डकेट (84) व झॅक क्राऊली (78) यांनी चांगली सुरुवात केली. त्यानंतर चौथ्या गड्यासाठी अनुभवी जो रूट व हॅरी ब्रूक यांनी तब्बल 454 धावांची भागीदारी केली. चौथ्या दिवशी रूट 262 धावा करून बाद झाला. यामध्ये 17 चौकारांचा समावेश होता.
रूट बाद झाल्यानंतर ब्रूक याने आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिले त्रिशतक पूर्ण केले. बाद होण्यापूर्वी त्याने 322 चेंडूंमध्ये 317 धावा केल्या. यामध्ये 29 चौकार व 3 षटकारांचा समावेश होता. भारताच्या वीरेंद्र सेहवागनंतर मुलतानच्या मैदानावर कसोटी त्रिशतक ठोकणारा तो पहिलाच फलंदाज ठरला. रूट व ब्रूक यांच्या या योगदानामुळे इंग्लंडने 800 पार मजल मारली. ब्रूक बाद झाल्यानंतर इंग्लंडने आपला डाव 7 बाद 823 असा घोषित केला. त्यांच्याकडे आता 267 धावांची आघाडी आहे.
(Harry Brook Hits 300 In Multan Test)