Breaking News

IPL 2024 Final| सनरायझर्सची खराब सुरूवात, पावर प्लेमध्ये स्टार्कने ओकली आग, पाहा Scorecard

IPL 2024 Final|आयपीएल 2024 चा अंतिम सामना कोलकाता नाईट रायडर्स विरूद्ध सनरायझर्स हैदराबाद (KKRvSRH) यांच्या दरम्यान खेळला गेला. या सामन्यात हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्स (Pat Cummins) याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, त्याचा हा निर्णय चुकीचा ठरला.

पहिल्याच षटकात मिचेल स्टार्क (Mitchell Starc) याने अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) याचा बॉल ऑफ द सीजन (Ball Of The Season) टाकत त्रिफळा उडवला. तर, दुसऱ्या षटकात वैभव अरोरा याने ट्रेविस हेड (Travis Head) याला खाते ही खोलू न देता तंबूचा रस्ता दाखवला. त्यामुळे हैदराबादने पहिल्या तीन षटकात केवळ 17 धावा केल्या.

अभिषेक शर्माला पहिल्या षटकातील पाचव्या चेंडूवर बॉल ऑफ द सीजन टाकत बाद केले. त्याने दोन धावा केल्या. त्यानंतर दुसऱ्या षटकातील अखेरच्या चेंडूवर युवा वैभव अरोडा याने हेड याला यष्टीरक्षक गुरबाजकरवी झेलबाद केले. त्याला खाते खोलता आले नाही. स्टार्कने पाचव्या षटकात पुन्हा एकदा गोलंदाजीला येत ‌राहुल त्रिपाठी याची देखील खेळी संपवली. त्याला केवळ नऊ धावा करता आल्या.

त्यानंतर ऐडन मार्करम व नितीश रेड्डी यांनी पावर प्ले संपेपर्यंत संघाचे धावसंख्या 3 बाद 39 पर्यंत नेली.

बातमी अपडेट होत आहे..

(IPL 2024 Final Starc Bowl Ball Of The Season Abhishek Sharma Travis Head Out Early)

 

 

3 comments

  1. awesome

  2. An interesting discussion is worth comment. I think that you should write more on this topic, it might not be a taboo subject but generally people are not enough to speak on such topics. To the next. Cheers

  3. I do love the way you have framed this specific matter plus it really does provide me some fodder for thought. However, coming from just what I have personally seen, I basically hope as the actual reviews pile on that people today remain on issue and in no way start on a soap box involving some other news of the day. All the same, thank you for this exceptional point and while I can not go along with the idea in totality, I respect the viewpoint.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *