Breaking News

Abhishek Sharma चा राडा सुरूच! फक्त 26 चेंडूत ठोकले वादळी शतक, इतक्या षटकारांची केली आतिषबाजी

abhishek sharma
Photo Courtesy: X

Abhishek Sharma 26 Ball Century|युवा भारतीय क्रिकेटपटू अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) सध्या त्याच्या कारकीर्दीतील सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे. आयपीएल 2024 (IPL 2024) मध्ये धमाकेदार कामगिरी केल्यानंतर आता क्लब क्रिकेटमध्ये देखील त्याने वादळ आणले. एका स्थानिक सामन्यात खेळताना त्याने केवळ 26 चेंडूंमध्ये 103 (Abhishek Sharma 26 Ball Century) धावांची तुफानी खेळी केली.

गुरुग्राम येथे शुक्रवारी (7 जून) एका स्थानिक क्लब सामन्यात खेळताना अभिषेक याने अक्षरशः धावांचा पाऊस पाडला. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येताना त्याने फक्त 26 चेंडूंचा सामना खेळला. यामध्ये चार चौकार व तब्बल 14 षटकारांची आतिशबाजी करत त्याने 103 धावा कुटल्या. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 396 इतका जबरदस्त होता. सध्या अभिषेक दिल्ली व गुरुग्राम परिसरात अनेक स्थानिक सामन्यांमध्ये खेळताना दिसतो.

नुकत्याच संपलेल्या आयपीएल 2024 मध्ये अभिषेक शर्मा यांनी तुफानी फटकेबाजी करत सनरायझर्स हैदराबाद संघाला अंतिम सामन्यापर्यंत नेले होते. त्याने या हंगामात 16 सामन्यात 484 धावा केल्या होत्या.‌‌ यामध्ये त्याचा स्ट्राईक रेट 204 इतका प्रभावी राहिलेला. तसेच हंगामात सर्वाधिक 42 षटकार मारण्याची कामगिरी त्याने केली होती. विशेष म्हणजे त्याने एकदाही 30 चेंडूंचा सामना केला नव्हता.

आयपीएल दरम्यानच भारताचे माजी क्रिकेटपटू हरभजन‌ सिंग व अंबाती रायुडू यांनी त्याला भारतीय टी20 संघात स्थान मिळावे अशी मागणी केली होती. भविष्यात तो लवकरच भारतीय संघासाठी खेळण्याची शक्यता आहे.

(Abhishek Sharma Hits 26 Ball 103 In Local Match At Gurugram Smash 14 Sixes)

T20 World Cup 2024| अफगाणिस्तानने वाजवले न्यूझीलंडचे बारा, राशिदच्या फिरकी पुढे किवीज नतमस्तक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *