
T20 World Cup 2024|टी20 विश्वचषक 2024 मध्ये उलटफेरांची मालिका सुरूच आहे. शनिवारी (8 जून) क गटात न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान (NZvAFG) असा सामना खेळला गेला. या सामन्यात अफगाणिस्तान संघाने न्यूझीलंड संघावर एकतर्फी वर्चस्व गाजवले.
𝐖𝐈𝐍𝐍𝐈𝐍𝐆 𝐌𝐎𝐌𝐄𝐍𝐓𝐒!!! 🤩#AfghanAtalan | #T20WorldCup | #AFGvNZ | #GloriousNationVictoriousTeam pic.twitter.com/NiXjADTP4r
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) June 8, 2024
रहमानुल्लाह गुरबाज (Rahmanullah Gurbaz) याच्या 80 धावांच्या योगदानामुळे अफगाणिस्तान संघाने न्यूझीलंडसमोर 160 धावांचे आव्हान ठेवले होते. या धावांचा पाठलाग करताना फझलहक फारूकी (Fazalhaq Farooqi) व राशिद खान (Rashid Khan) यांच्या प्रत्येकी चार बळींच्या जोरावर अफगाणिस्तान संघाने न्यूझीलंडचा डाव 75 धावांवर संपवत, 84 धावांनी मोठा विजय मिळवला. अफगाणिस्तानचा हा सलग दुसरा विजय ठरला.
गयाना येथे झालेल्या या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. गुरबाज (80) व इब्राहिम झादरान (44) यांनी अफगाणिस्तानला 14.3 षटकात 103 धावांची तगडी सलामी दिली. त्यानंतरचे इतर फलंदाज फारसे योगदान देऊ न शकल्याने अफगाणिस्तान संघ फक्त 159 पर्यंत मजल मारू शकला. न्यूझीलंडसाठी ट्रेंट बोल्ट व मॅट हेन्री यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले.
या धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या न्यूझीलंड संघाला सुरुवातीपासूनच आपला जम बसवता आला नाही. पहिल्याच चेंडूवर फिन ऍलन बाद झाल्यावर न्यूझीलंडची अवस्था तीन बाद 28 अशी फारुकीने केली. त्यानंतर राशिद खानने देखील त्याला साथ देत, मधली फळी कापून काढली. न्यूझीलंडसाठी ग्लेन फिलिप्स याने सर्वाधिक 18 धावा केल्या. फारूकी व राशिद यांनी प्रत्येकी चार तर मोहम्मद नबी याने दोन बळी आपल्या नावे केले. शानदार 80 धावांची खेळी करणारा गुरबाज सामनावीर ठरला.
(T20 World Cup 2024 Afghanistan Upset Newzealand By 84 Runs Rashid Farooqi Gurbaz Shines)