T20 World Cup : पाकिस्तान क्रिकेट संघाने कॅनडाविरुद्धच्या (PAK vs CAN) टी२० विश्वचषक २०२४ (T20 World Cup 2024) स्पर्धेतील आपल्या तिसऱ्या सामन्यात ७ विकेट्सने विजय मिळवला. हा पाकिस्तानचा साखळी फेरीतील पहिला विजय होता. मात्र या विजयानंतरही पाकिस्तानच्या सुपर आठ फेरी गाठण्याच्या आशा धूसर आहेत. बाबर आझम (Babar Azam) आणि संघाला त्यांचा साखळी फेरीतील आयर्लंडविरुद्धचा शेवटचा सामना मोठ्या फरकाने जिंकावा लागणार आहे. तसेच भारत आणि कॅनडा संघांच्या निकालावरही त्यांचे सुपर आठ फेरीचे गणित अवलंबून असेल.
एकीकडे पाकिस्तान संघाच्या प्रदर्शनामुळे चाहते नाराज आहेत. मात्र दुसरीकडे पाकिस्तानच्या ताफ्यातील एक खेळाडू प्रदर्शनाची पर्वा न करता न्यूयॉर्कमधील फास्ट फूडचा आनंद लुटताना दिसला आहे. पाकिस्तानचा फलंदाज आझम खान (Azam Khan) याचा न्यूयॉर्कमधील स्ट्रिट फूड खातानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडिओवर पाकिस्तानी चाहत्यांच्या संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.
आझम खान त्याच्या फिटनेसमुळे नेहमी टीकेचा धनी ठरत असतो. आपल्या वाढलेल्या वजनामुळे आझमला चाहत्यांच्या टीकेला सामोरे जावे लागते. अमेरिकेविरुद्धच्या पाकिस्तानच्या टी२० विश्वचषकातील पहिल्या सामन्यातील फ्लॉप प्रदर्शनानंतरही त्याच्या फिटनेसवर टीका झाली होती. या सामन्यात आझम खातेही न उघडता पव्हेलियनला परतला होता. त्यानंतर भारत आणि कॅनडाविरुद्धच्या सामन्यातून त्याला वगळण्यात आले. मात्र आऊट ऑफ फॉर्म असतानाही आझमला त्याच्या फिटनेसची थोडीही चिंता नसल्याचे दिसत आहे. आझम न्यूयॉर्कमधील रस्त्यांशेजारी असलेल्या गाड्यावर फास्ट फूड खाताना दिसला आहे. त्याचा व्हिडिओ पाहिल्यानंतर क्रिकेटप्रेमीं त्याच्यावर निशाणा साधत आहेत.
Aag lagi basti main, Azam apni masti mein! pic.twitter.com/zkWqO4nwmI
— Usman Jamil (@thtpakistaniguy) June 10, 2024