Breaking News

भारताच्या विजयाआड विराटच्या फ्लॉप फलंदाजीवर पडतोय पडदा, ‘हा’ क्रिकेटर सलामीसाठी ठरू शकतो बेस्ट ऑप्शन!

Virat Kohli :-  टी20 विश्वचषक 2024 मध्ये साखळी फेरीत आतापर्यंत भारतीय संघाने 3 सामने खेळले असून तिन्हीही सामन्यात विजय मिळवला आहे. परंतु भारतीय संघाच्या विजयाआड सलामीवीर विराट कोहली (Virat Kohli Batting Performance) याच्या फलंदाजी प्रदर्शनावर पडदा टाकला जात आहे. टी20 विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत सलामी देताना विराट सपशेल प्लॉप ठरला आहे. त्याने आतापर्यंत अनुक्रमे 1, 4 आणि 0 धावा केल्या आहेत. भारतासाठी टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराट कोहलीने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना खूप धावा केल्या आहेत. अशा स्थितीत सुपर आठ फेरीत कर्णधार रोहित शर्मा विराटला पुन्हा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीची संधी देत त्याला फॉर्ममध्ये परत आणण्यास मदत करू शकतो.

विराट आणि भारतीय संघाच्या समस्या एकच क्रिकेटर सोडवू शकतो आणि तो म्हणजे रिषभ पंत (Rishabh Pant). जर रिषभ भारतीय संघासाठी सलामीला आला तर विराट कोहलीला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी मैदानात उतरवलं जाऊ शकतं. जर रिषभने रोहित शर्मासोबत डावाची सुरुवात केली तर संघाला उजव्या आणि डाव्या हाताची सलामीची जोडी मिळेल. रिषभ सलामीला आला तर तो संघाला आक्रमक सुरुवात करुन देईल. अशा स्थितीत रोहित शर्माला दुसऱ्या टोकाला सेट होण्याची संधी मिळेल.

कोहली तिसऱ्या क्रमांकावर मोठ्या धावा करू शकतो!
रिषभ कर्णधार रोहितसह सलामीला उतरल्यास विराट तिसऱ्या क्रमांकावर उतरेल. त्यानंतर, सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या मधल्या फळीला मजबूत बनवतील. अशा स्थितीत शिवम दुबेला सहाव्या क्रमांकावर मैदानात उतरवले जाऊ शकते. रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल हे दोन फिरकीपटू भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनला आणखी बळ देतील. अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज हे भारतीय संघाला वेगवान गोलंदाजीत मजबूत करतील. एकूणच पंतला सलामीला उतरवण्याचा निर्णय भारतीय संघाला आणखी  ताकद देईल.

One comment

  1. I adore reading and I conceive this website got some really useful stuff on it! .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *