Hardik Pandya Fifty :- भारताचा अष्टपैलू हार्दिक पांड्या पुन्हा लयीत परतला आहे. शनिवारी (22 जून) अँटिग्वाच्या मैदानावर बांगलादेशविरुद्ध झालेल्या सुपर 8 सामन्यात पांड्याने वेगवान अर्धशतक केले. डावाच्या शेवटी झंझावाती अर्धशतक करत पांड्याने टीकाकारांची तोंडे तर गप्प केलीच, शिवाय इतिहासाला गवसणी घातली आहे. पांड्याने भारताकडून कोणत्याही क्रिकेटपटूला न जमलेला पराक्रम केला आहे.
संघाच्या 108 धावांवर यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत बाद झाला. त्यानंतर पांड्या फलंदाजीसाठी मैदानावर उतरला. पांड्याने अवघ्या 27 चेंडूत 3 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने नाबाद अर्धशतक झळकावले. सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना पांड्याने ही अर्धशतकी खेळी केली. यासह भारतीय संघाकडून टी20 विश्वचषकात सहाव्या क्रमांकावर अर्धशतक ठोकणारा पांड्या पहिलावहिला फलंदाज आहे. पांड्यापूर्वी कोणताही भारतीय फलंदाज या क्रमांकावर अर्धशतक जडू शकता नव्हता.
Hardik Pandya becomes the first Indian No.6 to score a fifty in the T20 World Cup history. 🚀 pic.twitter.com/6FnmV4xGL3
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) June 22, 2024
भारताचे बांगलादेशला 197 धावांचे आव्हान
दरम्यान प्रथम फलंदाजी करताना भारताकडून रोहितने 23 धावा केल्या. स्पर्धेत प्रथमच लयीत दिसलेल्या विराटने 28 चेंडूवर 37 धावा काढल्या. मागील दोन सामन्यात अर्थशतक झळकावलेला सूर्यकुमार यादव फक्त सहा धावांचे योगदान देऊ शकला. मधल्या फळीत पंत याने 36 तर दुबेने 34 धावा चोपल्या.
उपकर्णधार हार्दिक पंड्या याने यावेळी जबाबदारीने खेळ करत अखेरपर्यंत नाबाद राहत 27 चेंडूत 50 धावा केल्या. यामध्ये चार चौकार व तीन षटकारांचा समावेश होता. बांगलादेश संघासाठी वेगवान गोलंदाज तंझीम हसन व रिशाद होसेन यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले.