Breaking News

क्रिकेटची जय! ऐतिहासिक विजयानंतर तालिबानला न जुमानता रस्त्यावर उतरले अफगाणी चाहते, पाहा VIDEO

Afghanistan Beat Australia
Photo Courtesy: X/ACB

Afghanistan Beat Australia|टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) मध्ये रविवारी (23 जून) एक ऐतिहासिक सामना पाहायला मिळाला. ऑस्ट्रेलिया विरुद्ध अफगाणिस्तान (AUS vs AFG) अशा झालेल्या या सामन्यात अफगाणिस्तान ऑस्ट्रेलियाला (Afghanistan Beat Australia) पराभूत केले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अफगाणिस्तानने प्रथमच ऑस्ट्रेलियाला हरवण्याची कामगिरी केली. या विजयानंतर अफगाणिस्तानच्या रस्त्यांवर मोठा जल्लोष पाहायला मिळाला.

सुपर 8 फेरीतील या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाला विजेते पदाचे दावेदार मानले जात होत. मात्र, अफगाणिस्तानने सर्वांचे अंदाज चुकवत मोठा विजय साजरा केला. गुरबाज व इब्राहिम यांनी केलेल्या शतकी भागीदारीमुळे संघाने 160 अशी सन्मानजनक मजल मारली होती. त्यानंतर नवीन उल-हक व गुलबदीन नईब यांनी प्रत्येकी तीन व चार बळी मिळवून संघाला 21 धावांनी दणदणीत विजय मिळवून दिला. या विजयानंतर अफगाणिस्तान संघाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

त्यांच्या मायदेशात देखील या विजयाचा आनंद साजरा केला गेला. अफगाणिस्तानची राजधानी असलेल्या काबुल येथे लोकांनी घराबाहेर पडत रस्त्यावर जल्लोष केला. हजारो लोक या आनंदोत्सवात सामील झाले होते. विशेष म्हणजे यामध्ये महिला व लहान मुले देखील दिसून आली. तसेच खोस्त प्रांतात फटाके फोडून जल्लोष केलेला दिसून आला.

मागील काही वर्षांपासून अफगाणिस्तानमध्ये तालिबानने पुन्हा एकदा आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. त्यामुळे देशात सतत दहशतीचे वातावरण असते. महिलांना सार्वजनिक ठिकाणी येण्यास अथवा नोकरी करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. असे असले तरी, संघाचा विजय साजरा करण्यासाठी लोक रस्त्यावर आले. यादरम्यान तालिबानने देखील या विजयाचा आनंद साजरा केला.

(Afghanistan Beat Australia Afghani Fans Gathered On Road For Celebration)

ऐतिहासिक! अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाला लोळवले! वनडे वर्ल्डकप पराभवाचा घेतला बदला, सेमीफायनलच्या आशा पल्लवित

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *