Breaking News

वर्ल्डकप पराभवाची टीम इंडियाकडून सव्याज परतफेड! अजिंक्य राहत भारत T20 World Cup 2024 सेमी फायनलमध्ये

team india
Photo Courtesy: X/BCCI

T20 World Cup 2024: टी20 विश्वचषक 2024 मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) असा सामना खेळला गेला. ग्रॉस आयलेट येथे झालेल्या या सामन्यात चांगला संघर्ष पाहायला मिळाला. मात्र, भारतीय संघाने आपली विजयाची मालिका कायम ठेवत 24 धावांनी विजय साजरा केला. या विजयामुळे भारताने 2023 वनडे विश्वचषक अंतिम सामन्यातील पराभवाची परतफेड केली. यासह भारताने उपांत्य फेरीतील आपली जागा पक्की केली आहे. तर, ऑस्ट्रेलियाला आता अफगाणिस्तान विरूद्ध बांगलादेश या सामन्याच्या निकालावर लक्ष ठेवावे लागणार आहे.

बातमी अपडेट होत आहे…

(India Beat Australia In T20 World Cup 2024)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *