Breaking News

BCCI Awards 2023-2024: सचिनला जीवनगौरव तर बुमराह सर्वोत्तम, वाचा सर्व पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी

BCCI AWARDS 2023-2024
Photo Courtesy: X

BCCI Awards 2023-2024: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून दिल्या जाणाऱ्या वार्षिक पुरस्कारांची (BCCI Awards 2023-2024) घोषणा करण्यात आली आहे. शनिवारी (1 फेब्रुवारी) मुंबई येथे झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात भारतीय क्रिकेटमध्ये मागील वर्षी सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना सन्मानित केले गेले. भारताचा सर्वकालीन महान फलंदाज सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याला जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला.

BCCI Awards 2023-2024

बीसीसीआय वार्षिक पुरस्कार 2023-2024 (Naman BCCI Awards 2025)

कर्नल सी.के नायडू जीवनगौरव पुरस्कार- सचिन तेंडुलकर

बीसीसीआय विशेष पुरस्कार- रविचंद्रन अश्विन

पॉली उम्रीगर सर्वोत्तम पुरुष आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू- जसप्रीत बुमराह

सर्वोत्तम महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू- स्मृती मंधाना

सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय पदार्पण (पुरूष)- सर्फराज खान

सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय पदार्पण (महिला)- आशा शोभना

देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वोत्तम संघ- मुंबई

लाला अमरनाथ पुरस्कार

देशांतर्गत क्रिकेटमधील मर्यादित षटकांचा सर्वोत्तम अष्टपैलू- शशांक सिंग

देशांतर्गत क्रिकेटमधील प्रथम श्रेणी क्रिकेटचा सर्वोत्तम अष्टपैलू- तनुष कोटियान

माधवराव सिंधिया पुरस्कार

सर्वाधिक धावा (रणजी ट्रॉफी एलिट )- रिकी भुई

सर्वाधिक धावा (रणजी ट्रॉफी प्लेट)- अग्नी चोप्रा

सर्वाधिक बळी (रणजी ट्रॉफी एलिट )- साई किशोर

सर्वाधिक बळी (रणजी ट्रॉफी प्लेट)- तनय त्यागराजन

एम. ए चिदंबरम पुरस्कार 

सर्वाधिक धावा ( सी.के नायडू ट्रॉफी एलिट अंडर-23)- अनिश केवी

सर्वाधिक धावा ( सी.के नायडू ट्रॉफी प्लेट अंडर-23)- हेम छत्री

सर्वाधिक बळी ( सी.के नायडू ट्रॉफी एलिट अंडर-23)- पी.विद्युत

सर्वाधिक बळी ( सी.के नायडू ट्रॉफी प्लेट अंडर-23)- एन. रूपरेव

सर्वाधिक धावा ( कुचबिहार ट्रॉफी एलिट अंडर-19)- काव्य तेवतिया

सर्वाधिक बळी ( कुचबिहार ट्रॉफी एलिट अंडर-19)- विष्णू भारद्वाज

जगमोहन दालमिया पुरस्कार 

देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू (वरिष्ठ)- प्रिया मिश्रा

देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू (कनिष्ठ)- ईश्वरी अवसरे

विजय मर्चंट ट्रॉफी (अंडर 19 महिला) सर्वाधिक धावा- एल. रायचंदानी

विजय मर्चंट ट्रॉफी (अंडर 19 महिला) सर्वाधिक बळी- एच. जगनाथन

BCCI Awards 2023-2024 Sachin Tendulkar Received Lifetime Achievement Award