
Team India Grand Welcome: भारतीय क्रिकेट संघाने (Indian Cricket Team) 29 जून रोजी दुसऱ्यांदा टी20 विश्वचषक (T20 World Cup 2024) आपल्या नावे केला. त्यानंतर आता चार दिवस झाले तरी भारतीय संघ अद्याप मायदेशात परतला नाही. मात्र, आता भारतीय संघाने मायदेशाकडे प्रयाण केले असून, लवकरच संघ भारतात दाखल होईल. त्यानंतर आता भारतीय संघाचा पुढील कार्यक्रम कसा राहील याबाबत माहिती समोर येत आहे.
विश्वचषक विजयानंतर संघ दुसऱ्या दिवशी भारताकडे उड्डाण भरणार होता. मात्र, बार्बाडोस येथे चक्रीवादळ आल्याने विमानतळे बंद करण्यात आलेली. त्यामुळे भारतीय संघाचा येथील मुक्काम वाढला. बीसीसीआयने एअर इंडियाचे खास चार्टर प्लेन बार्बाडोसला पाठवले. भारतीय संघ आणि जवळपास वीस भारतीय पत्रकारांना घेऊन भारतीय प्रमाणवेळेनुसार बुधवारी सकाळी हे प्लेन बार्बाडोस येथून उडाले आहे. गुरुवारी पहाटे पाच वाजेपर्यंत ते दिल्ली येथे उतरेल.
दिल्ली येथे पोहोचल्यानंतर भारतीय संघ भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची भेट घेईल. पंतप्रधान संपूर्ण संघासह ब्रेकफास्ट घेतील. यानंतर संघ मुंबईला रवाना होईल. मुंबई येथील पोहोचल्यानंतर सायंकाळी 4 वाजता नरीमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियम असा प्रवास भारतीय संघाला करावा लागणार आहे. ही संघाची विजयी मिरवणूक असेल असे सांगण्यात येतेय. भारतीय खेळाडूंना एका ओपन बसमध्ये बसवून ही मिरवणूक होईल.
एमएस धोनी याच्या नेतृत्वातील भारतीय संघाने 2007 मध्ये प्रथम टी20 विश्वचषक जिंकला होता. त्यावेळी भारतीय संघाचे अशाच प्रकारे मुंबईमध्ये अभूतपूर्व स्वागत करण्यात आले होते. त्याच धर्तीवर ही मिरवणूक होणार आहे.
(T20 World Cup Winning Team India Victory Parade In Mumbai)
One comment
Pingback: Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score ।