Breaking News

Wanindu Hasranga: भारताविरुद्धच्या मालिकेआधीच श्रीलंकन कर्णधाराचा राजीनामा! भावनिक पोस्ट करत म्हणाला…

WANINDU HASRANGA
Photo Courtesy: X

Wanindu Hasranga Resign As Captain: जुलै महिन्याच्या अखेरीस भारतीय क्रिकेट संघ श्रीलंका दौऱ्यावर (India Tour Of Srilanka) जाणार आहे. तत्पूर्वी, श्रीलंकेच्या टी20 संघाचा कर्णधार वनिंदू हसरंगा (Wanindu Hasranga) याने कर्णधारपदाचा राजीनामा दिला.

सध्या श्रीलंकेत लंका प्रीमियर लीग खेळली जातेय. ही स्पर्धा सुरू असतानाच हसरंगा याने आपण राष्ट्रीय संघाचे नेतृत्व सोडत असल्याचे श्रीलंका क्रिकेट बोर्डाला सांगितले. श्रीलंका क्रिकेट बोर्डाकडून याबाबत अधिकृत पत्रक जाहीर करण्यात आले. त्यामध्ये सांगितले गेले आहे की, ‘आम्ही आमच्या सर्व चाहत्यांना सुचित करू इच्छितो की, वनिंदू हसरंगा याने टी20 संघाचे नेतृत्व सोडण्याचा निर्णय घेतला आहे. असे असले तरी तो खेळाडू म्हणून राष्ट्रीय संघासाठी आपले योगदान देईल. राष्ट्रीय संघाचा तो एक महत्त्वाचा खेळाडू आहे.”

हसरंगा याने आपल्या बाजूने बोलताना म्हटले, “मी टी20 संघाचे नेतृत्व सोडत आहे. एका खेळाडूच्या रूपात मी नेहमीच संघासोबत तसेच आपल्या कर्णधाराला गरज असेल तेव्हा सर्वात पुढे होऊन कामगिरी करण्याचा प्रयत्न करेल.”

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप 

हसरंगा याने श्रीलंका संघाचे केवळ दहा सामन्यांमध्ये नेतृत्व केले. यापैकी सहा सामन्यात विजय मिळवण्यात संघाला यश आले होते. मात्र, टी20 विश्वचषकात श्रीलंका संघ अपयशी ठरलेला. बांगलादेश व दक्षिण आफ्रिका यांच्याकडून पराभूत झाल्यानंतर त्यांनी नेदरलँड्सला मात दिली होती. परंतु, नेपाळ विरुद्धचा अखेरचा सामना पावसामुळे रद्द झाल्याने त्यांना सुपर 8 फेरीत प्रवेश करता नाही. श्रीलंका संघाचा पुढील टी20 कर्णधार म्हणून कुसल मेंडिस याच्या नावाचा विचार होऊ शकतो.

(Wanindu Hasranga Resign As Srilanka T20I Captain)