Breaking News

ENG vs WI: इंग्लंडची ऍंडरसनला विजयी विदाई! लॉर्ड्स कसोटीत वेस्ट इंडिज तिसऱ्याच दिवशी गारद

ENG vs WI
Photo Courtesy: X/ECB

ENG vs WI: इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्या दरम्यानच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना लॉर्ड्स (Lords Test) येथे खेळला गेला. इंग्लंडने तिसऱ्या दिवशी या सामन्यात एक डाव आणि 114 धावांनी मोठा विजय मिळवला. हा वेगवान गोलंदाज जेम्स ऍंडरसन याचा अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना (James Anderson Last Test) होता. या सामन्यात विजय मिळवत इंग्लंड संघाने त्याच्या कारकिर्दीची शानदार अखेर केली.

सामन्याच्या पहिल्याच दिवशी पाहुणा वेस्ट इंडीज संघ स्वस्तात गारद झाला होता. पदार्पण करणाऱ्या गस ऍटकिन्सन याने केवळ 45 धावांमध्ये सात बळी घेत वेस्ट इंडिजचा डाव 121 धावांमध्ये संपवलेला. त्यानंतर इंग्लंडने आपल्या पहिल्या डावात 371 धावा उभ्या केल्या. इंग्लंडसाठी सलामीवीर झॅक क्राऊली (76), ओली पोप (57), हॅरी ब्रूक (50) व पदार्पण करणारा जेमी स्मिथ (70) यांनी अर्धशतके झळकावली.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप 

तब्बल 250 धावांची पिछाडी भरून काढताना वेस्ट इंडिज संघाचा दुसरा डावही कोसळला. दुसऱ्या दिवशी जेम्स ऍंडरसन, गस ऍटकिन्सन व बेन स्टोक्स यांच्यापुढे वेस्ट इंडिजने आपले सहा बळी गमावले होते. तिसऱ्या दिवसाची सुरुवात झाल्यानंतर जेम्स ऍंडरसन व गस ऍटकिन्सन यांनी दोन्ही बाजूने गोलंदाजी करत त्यांचा डाव 105 धावांवर संपवला. यासह त्याने आपल्या कसोटी कारकीर्दीत 188 सामने खेळताना तब्बल 704 बळी आपल्या नावे केले. पूर्ण सामन्यात 12 बळी मिळवणारा गस ऍटकिन्सन सामनावीर ठरला.

(ENG vs WI England Beat West Indies In James Anderson Last Test)