Breaking News

अर्जेंटिना COPA AMERICA 2024 चॅम्पियन! मेस्सीच्या नेतृत्वात सलग दुसरे विजेतेपद, कोलंबिया पराभूत

copa 2024
Photo Courtesy: X/COPA AMERICA

COPA America 2024: अमेरिका खंडातील फुटबॉलची सर्वात मोठे स्पर्धा असलेल्या कोपा अमेरिका (COPA America 2024) स्पर्धेचा अंतिम सामना सोमवारी (15 जुलै) सकाळी पार पडला. गतविजेता अर्जेंटिना व कोलंबिया (ARGvsCOL) यांच्या दरम्यान झालेल्या या सामन्यात एक्स्ट्रा टाईममध्ये विजेता मिळाला. अर्जेंटिनाच्या मार्टिनेझ (Lautaro Martinez) याने केलेल्या गोलमुळे अर्जेंटिनाने सलग दुसऱ्यांदा ही स्पर्धा आपल्या नावे केली.

(Argentina Won Copa America 2024)