Breaking News

Paris Olympics 2024: लक्ष्यसह चिराग-सात्विकने केला विजयी प्रारंभ, टेबल टेनिसपटू हरमीत टॉप 64 मध्ये

PARIS OLYMPICS 2024
Photo Courtesy: X

Paris Olympics 2024 Updates: पॅरिस ऑलिंपिक्स 2024 (Paris Olympics 2024) मध्ये पहिल्या दिवशी बॅडमिंटन खेळातून भारतासाठी आनंदाच्या बातम्या आल्या. पुरुष एकेरीत खेळणारा युवा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन (Lakshya Sen) व पुरुष दुहेरी तील अव्वल जोडी सात्विक साईराज व चिराग शेट्टी (Satwik Sairaj – Chirag Shetty) यांनी आपापल्या गटातील पहिले सामने जिंकत, विजयी सुरुवात केली.

लक्ष्य सेन याच्यासमोर स्पर्धेतील आपल्या पहिल्या सामन्यात ग्वाटेमालाच्या केविन कोरडन याचे आव्हान होते. लक्ष्य याने पहिल्या गेममध्ये त्याच्यावर एकतर्फी वर्चस्व गाजवत 21-8 असा सहज गेम जिंकला. मात्र, दुसऱ्या गेममध्ये केविन याने जबरदस्त पुनरागमन केले. त्याने एकवेळ 20-17 अशी आघाडी घेतली होती. मात्र, लक्ष्य याने सतत पाच गुण मिळवत सामना 22-20 असा जिंकला.

पुरुष दुहेरीमध्ये विजेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जात असलेल्या सात्विक साईराज व चिराग शेट्टी या जोडीने यजमान फ्रान्सच्या जोडीला एकतर्फी पराभूत केले. त्यांनी 21-17, 21-14 असा सोपा विजय मिळवला.

भारताचा युवा टेबल टेनिसपटू हरमीत देसाई याने देखील 4-0 असा सरळ गेम मध्ये विजय मिळवत राऊंड ऑफ 64 मध्ये प्रवेश केला. पुढील फेरीपासून त्याच्या पुढील आव्हान अधिक कठीण असणार आहे.

(Paris Olympics 2024 Updates Lakshya Sen Satwiksairaj And Chirag Register Wins)

Paris Olympics 2024: अखेर खुशखबरी आली! ‘ही’ शूटर फायनलसाठी क्वालिफाय, रिदमच्या पदरी अपयश