![rohit virat](https://kridacafe.com/wp-content/uploads/2024/06/rohit-sharma-virat-kohli.jpg)
Rohit Virat Likely Play Duleep Trophy 2024: भारतीय क्रिकेटचा नवा देशांतर्गत हंगाम लवकरच सुरू होत आहे. त्याचाच एक भाग असलेली दुलिप ट्रॉफी (Duleep Trophy 2024) ही स्पर्धा चार संघादरम्यान खेळली जाईल. या स्पर्धेसाठी आता जवळपास सर्वच अनुभवी खेळाडू उपलब्ध असल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये कसोटी संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) व विराट कोहली (Virat Kohli) यांचा देखील समावेश आहे. हे दोघे या स्पर्धेमध्ये खेळण्यास मोठ्या कालावधीनंतर ते देशांतर्गत क्रिकेट खेळताना दिसतील.
श्रीलंका दौऱ्यानंतर भारतीय संघाला मोठा कालावधी विश्रांतीसाठी मिळाला आहे. बांगलादेशविरुद्धची कसोटी मालिका 19 सप्टेंबर पासून सुरु होईल. या दरम्यानच चार संघांची दुलिप ट्रॉफी स्पर्धा खेळली जाणार आहे. यावेळी विभागवार दुलिप ट्रॉफी होत नसल्याने, भारतीय संघातील खेळाडूंना देखील या स्पर्धेत खेळता येईल. दुलिप ट्रॉफीसाठी अ, ब, क आणि ड असे संघ करण्यात येतील. ही स्पर्धा 5 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर या कालावधीत होणार आहे.
दुलिप ट्रॉफीच्या पहिल्या फेरीच्या सामन्यात रोहित व विराट खेळण्याची शक्यता आहे. यासोबतच भारताच्या संघाचे नियमित सदस्य असलेले कुलदीप यादव, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, केएल राहुल, रिषभ पंत व श्रेयस अय्यर या स्पर्धेत खेळण्यास सांगण्यात आल्याचे कळते. यासोबतच सध्या बीसीसीआयच्या करारातून बाहेर असलेला ईशान किशन हा देखील खेळताना दिसण्याची दाट शक्यता आहे. गौतम गंभीर भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक बनल्यानंतर, वरिष्ठ खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेट खेळावे लागेल, अशी चर्चा सुरू झाली होती.
बांगलादेशविरुद्धच्या मालिकेआधी भारतीय संघाचा एक कॅम्प चेन्नई येथे आयोजित केला जाईल. तत्पूर्वी, हे सर्व खेळाडू प्रत्येकी एक सामना खेळून या कॅम्पमध्ये दाखल होतील. या अनुभवी खेळाडूं व्यतिरिक्त सर्फराज खान, ध्रुव जुरेल, आकाश दीप व मुकेश कुमार हेदेखील एका संघाचा भाग असणार आहेत. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह मात्र या काळात विश्रांतीच घेताना दिसेल.
(Rohit Virat And All Seniors Likely Play Duleep Trophy 2024)
One comment
Pingback: Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score ।