Breaking News

Team India Bowling Coach: अखेर सस्पेन्स संपला! 544 बळी घेतलेला दिग्गज बनला टीम इंडियाचा बॉलिंग कोच

team india bowling coach
Photo Courtesy; X/BCCI

Team India Bowling Coach Morne Morkel: मागील महिनाभरापासून भारतीय क्रिकेट संघाच्या (Indian Cricket Team) नव्या गोलंदाजी प्रशिक्षकाचा (Team India Bowling Coach) शोध सुरू होता. अखेर आता या प्रकरणातील सस्पेन्स संपला असून, भारताचा नवा गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज मॉर्नी मॉर्केल (Morne Morkel) याच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. बांगलादेशविरूद्धच्या कसोटी मालिकेपासून तो या भूमिकेत दिसेल.

टी20 विश्वचषकानंतर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड व गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांब्रे यांचा कार्यकाळ समाप्त झाला होता. त्या जागी नवीन मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीर (Head Coach Gautam Gambhir) याने जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. तसेच, दोन सहाय्यक प्रशिक्षक म्हणून अभिषेक नायर व रेयान टेन डोशचे यांची नियुक्ती केली गेली. क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून टी दिलीप हे आपल्या पदावर कायम राहिले.

असे असताना गोलंदाजी प्रशिक्षकासाठी बीसीसीआय व मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या दरम्यान एकमत बनत नव्हते. सुरुवातीला गंभीरने विनयकुमार याच्या नावाची शिफारस केली होती. तर, बीसीसीआय झहीर खान व एल. बालाजी यांच्यासाठी आग्रही असल्याचे सांगितले गेलेले. त्यानंतर गंभीरने मॉर्केल याचा पर्याय सुचवला. या सर्व घडामोडीत श्रीलंका दौऱ्यावर साईराज बहुतुले हे अंतरिम गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून संघासोबत गेले होते. मात्र, आता मॉर्केल हे नाव अंतिम झाले आहे.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप 

सध्या केवळ 39 वर्षांच्या असलेल्या मॉर्केल याने 12 वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले असून, तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये मिळून त्याच्या नावे 544 बळी जमा आहेत. याव्यतिरिक्त आयपीएलमध्ये देखील तो सातत्याने खेळताना दिसला होता. निवृत्तीनंतर त्याने प्रशिक्षक म्हणून पाकिस्तान क्रिकेट संघासोबत काम केले. तसेच, आयपीएलमध्ये तो लखनौ सुपरजायंट्स संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक देखील होता.

(Morne Morkel Becomes Team India Bowling Coach)

अखेर Rohit Virat झुकलेच! बीसीसीआयच्या ‘त्या’ निर्णयामुळे सगळ्याच सिनियर्सची सुट्टी कॅन्सल