Breaking News

टीम इंडियाला नडणारा Brendan Taylor करतोय 39 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय कमबॅक! असं राहिलय करियर

brendan taylor
Photo Courtesy: X

Brendan Taylor Comeback In International Cricket: झिम्बाब्वे क्रिकेट संघ सध्या न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे. मायदेशातील मालिकेतील दुसऱ्या सामन्यासाठी झिम्बाब्वे संघाची निवड करण्यात आली असून, यामध्ये तब्बल चार वर्षांनंतर खेळाडू पुनरागमन करतोय.

Brendan Taylor Comeback In International Cricket

झिम्बाब्वेचा माजी कर्णधार राहिलेला ब्रेंडन टेलर चार वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना दिसेल. स्पॉट फिक्सिंग प्रकरणातील बंदीनंतर तो संघात परतेल. तब्बल दोन वेळा निवृत्ती घेतल्यानंतर तो पुनरागमन करेल. टेलर याने 2015 मध्ये वनडे विश्वचषकानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेली. मात्र, दोन वर्षांनी हा निर्णय बदलत त्याने पुनरागमन केले. (Latest Cricket News)

टेलर याने त्यानंतर 2021 मध्ये आपला अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. त्यानंतर स्पॉट फिक्सिंग प्रकरणातील सहभागाबद्दल 2022 मध्ये तीन वर्षाची बंदी घालण्यात आली. त्याची ही बंदी 29 जुलै रोजी समाप्त झाले असून, तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी पात्र ठरला. टेलर याला 2015 वनडे विश्वचषक स्पर्धेतील भारताविरुद्धच्या सामन्यातील शतकी खेळीसाठी ओळखले जाते (Brendan Taylor 100 Against India).

टेलर याने आतापर्यंत झिम्बाब्वेसाठी 34 सामना खेळताना 2320 धावा केलेल्या. तर, 205 वनडेत 6684 धावा व 45 टी20 मध्ये 934 धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या आहेत. झिम्बाब्वेसाठी 10,000 आंतरराष्ट्रीय धावा बनवण्याची संधी त्याच्याकडे असेल. तर, 2027 वनडे विश्वचषकाच्या दृष्टीने देखील त्याचे पुनरागमन महत्त्वाचे मानले जात आहे.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

हे देखील वाचा: तब्बल 4 बदलांसह इंग्लंड खेळणार Oval Test, भारताकडे मालिका बरोबरीत आणण्याची सुवर्णसंधी