Breaking News

न्यूझीलंड 14 वर्षानंतर Womens T20 World Cup फायनलमध्ये! विंडीजच्या पदरी निराशा

womens t20 world cup
Photo Courtesy: X

Womens T20 World Cup 2024: महिला टी20 विश्वचषक (Womens T20 World Cup) स्पर्धेचा दुसऱ्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंड महिला विरुद्ध वेस्ट इंडिज महिला (NZW v WIW) समोरासमोर आले. न्यूझीलंडने या सामन्यात  धावांनी विजय मिळवत अंतिम फेरी प्रवेश केला. अंतिम सामन्यात त्यांच्यापुढे दक्षिण आफ्रिकेचे आव्हान असेल.

तब्बल आठ वर्षानंतर विजेतेपद मिळवण्याच्या प्रयत्नात असलेली वेस्ट इंडीज आणि आपल्या पहिल्या विजेतेपदाच्या प्रतिक्षेत असलेल्या न्यूझीलंड यांच्यातील या सामन्यात न्यूझीलंडला प्रथम फलंदाजीची संधी मिळाली. त्यांना बेट्स (26) व प्लिमर (33) यांनी 48 धावांची संथ मात्र आश्वासक सुरुवात दिली. त्यानंतर मात्र कोणीही मोठी धावसंख्या बनवू शकले नाही. गेझने नाबाद 20 धावा करत संघाला 128 पर्यंत पोहोचवले. डिएंड्रा डॉटीनने सर्वाधिक चार बळी मिळवले.

या धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजसाठी टिकून राहण्याचा प्रयत्न केला नाही. डॉटिन मोक्याच्या क्षणी तीन षटकार मारत 33 धावा करत सामन्यात रंगत वाढवली. मात्र, विजयासाठी 33 धावा शिल्लक असताना एमिलीया कर (Amelia Kerr) हीने तिला बाद केले. त्यानंतर जेम्स व फ्लेचर यांनी विजयासाठी प्रयत्न केले. मात्र, त्यांना आठ धावांनी पराभूत व्हावे लागले.

आता 20 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या अंतिम सामन्यात ते दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहेत. त्यामुळे यावेळी महिला टी20 विश्वचषक कोणताही नवा संघच उचलणार हे निश्चित झाले आहे.

(Newzealand Reach Womens T20 World Cup 2024 Final)