Breaking News

इंग्लंडविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी Team India ची घोषणा, अनुभवी खेळाडूचे 15 महिन्यांनी पुनरागमन

TEAM INDIA
Photo Courtesy: X/BCCI

Team India For England T20 Series: इंग्लंडविरुद्धच्या आगामी टी20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात भारत ही मालिका खेळेल. या मालिकेसाठी अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammad Shami) याची निवड करण्यात आली असून, शमी तब्बल 15 महिन्यानंतर भारतीय संघात दिसेल.

Team India For England T20 Series

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

निवड समितीने या मालिकेसाठी अनुभवी अक्षर पटेल याच्याकडे संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी दिली आहे. अष्टपैलू म्हणून हार्दिक पंड्यासह नितिशकुमार रेड्डी दिसेल. वॉशिंग्टन सुंदर हा पर्यायी अष्टपैलू असेल. शुबमन गिल व रिषभ पंत संघात जागा बनवू शकले नाहीत. तर जसप्रीत बुमराह याला विश्रांती देण्यात आली आहे.

टी20 मालिकेसाठी भारतीय संघ: सूर्यकुमार यादव (कर्णधार), अक्षर पटेल (उपकर्णधार), संजू सॅमसन, हार्दिक पंड्या, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, रिंकू सिंग, हर्षित राणा, नितिशकुमार रेड्डी, ध्रुव जुरेल, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी, वरूण चक्रवर्ती, रवी बिश्नोई व वॉशिंग्टन सुंदर.

हे देखील वाचा- Champions Trophy 2025 च्या संघ निवडीवर मोठी अपडेट, अनुभवी खेळाडूंचा पत्ता कट?

(Team India For England T20 Series)