India Squad For Champions Trophy 2025: चॅम्पियन ट्रॉफी 2025 (Champions Trophy 2025) व इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. पंधरा जणांच्या संघाचे नेतृत्व रोहित शर्मा करेल. तर, उपकर्णधारपदाची जबाबदारी युवा शुबमन गिल याच्या खांद्यावर टाकण्यात आली आहे. असे असताना, आता काही खेळाडूंवर अन्याय झाल्याचे बोलले जाते.
No Siraj Samson Karun In Champions Trophy 2025
अत्यंत महत्त्वाच्या स्पर्धेसाठी संघ घोषित करताना अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) याचा विचार केला गेला नाही. सिराज मागील काही वर्षांपासून सातत्याने संघाचा भाग होता. वनडे विश्वचषक स्पर्धेत त्याची कामगिरी चांगली राहिली होती. तसेच, तो वनडे क्रिकेटमधील गोलंदाजी क्रमवारीतील भारताचा सर्वोत्तम गोलंदाज आहे. असे असताना त्याच्याकडे दुर्लक्ष केले. विशेष म्हणजे बुमराह इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी नसताना देखील त्याला त्या मालिकेतूनही वगळण्यात आले आहे.
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
संघ घोषित होण्याच्या अगदी महिनाभरापासून संजू सॅमसन (Sanju Samson) याच्या नावाची चर्चा होती. मात्र, अंतिम संघात त्याला जागा मिळाली नाही. रिषभ पंत व केएल राहुल हे यष्टीरक्षक म्हणून या संघात खेळतील. संजू याने टी20 आंतरराष्ट्रीय मध्ये जबरदस्त फॉर्म दाखवल्यानंतर, त्याच्या निवडीची अपेक्षा व्यक्त केली जात होती. संजूने दक्षिण आफ्रिकेत दोन टी20 सत्य पूर्ण केलेली.
देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात महत्त्वाची लिस्ट ए स्पर्धा असलेल्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत धावांचा अक्षरशः पाऊस पाडलेल्या करून नायर (Karun Nair) याला देखील या स्पर्धेसाठी संघात जागा बनवण्यात अपयश आले. करूण याने या स्पर्धेत आत्तापर्यंत 7 सामन्यात 752 धावा केल्या असून, यामध्ये तो फक्त एकदाच बाद झाला. करूण याची संघात निवड होईल याबाबत अनेक माजी क्रिकेटपटू आशावादी होते.
(No Siraj No Samson No Karun Nair For Champions Trophy 2025)
Champions Trophy 2025 साठी टीम इंडियाची घोषणा, रोहितच्या नेतृत्वात हे 15 शिलेदार सज्ज
One comment
Pingback: Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score ।