![mohammad siraj](https://kridacafe.com/wp-content/uploads/2025/01/gambhir-siraj.jpg)
Mohammad Siraj Not Picked For Champions Trophy: चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (Champions Trophy 2025) साठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वातील पंधरा सदस्यीय संघात अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) याला जागा मिळाली नाही. त्यानंतर आता विविध चर्चांना सुरुवात झाली आहे.
Mohammad Siraj Not Picked For Champions Trophy 2025
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी सिराज याची भारतीय संघात निवड होईल अशी सर्वांना अपेक्षा होती. मात्र, त्याला संघाच स्थान मिळाले नाही. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी व अर्शदीप सिंग हे तीनच वेगवान गोलंदाज या महत्त्वाच्या स्पर्धेसाठी निवडले गेले. अष्टपैलू हार्दिक पंड्या हा चौथ्या वेगवान गोलंदाजाची भूमिका पार पाडू शकतो. जसप्रीत बुमराह याच्या इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी अनुपस्थितीनंतरही त्याच्या जागी युवा हर्षित राणा (Harshit Rana) याची निवड केली गेली आहे.
सिराज हा सध्या जागतिक वनडे गोलंदाजी क्रमवारीत आठव्या स्थानी आहे. तसेच, काही महिन्यांपूर्वीच तो या क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर होता. तसेच 2023 वनडे विश्वचषकात त्याने 11 सामन्यात 14 बळी मिळवले होते. नुकत्याच झालेल्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये सिराजने 20 बळी आपल्या नावे केलेले.
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Head Coach Gautam Gambhir) हे राणा याला सातत्याने संधी देण्याचे बोलत असतात. आयपीएल 2024 मध्ये केकेआर संघाचे मेंटर असताना राणाने संघासाठी चांगली कामगिरी केली होती. त्यानंतर त्याला भारताकडून पदार्पण करण्याची संधी मिळाली. इतकेच नव्हे तर आयपीएल रिटेन्शनमुळे गंभीर यांनीच राणाचे आंतरराष्ट्रीय पदार्पण लांबवल्याचा आरोप केला जात होता. यानंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर दोन कसोटी सामन्यात राणा याला संधी मिळाली. मात्र, तेथे तो फक्त चार बळी मिळवू शकला.
(Mohammad Siraj Not Picked For Champions Trophy 2025)
हे देखील वाचा- कामगिरी दमदार, तरीही Champions Trophy 2025 साठी या तिघांचा नाही झाला विचार