Dwarkanath Sanzgiri Demise: ज्येष्ठ क्रिकेट समीक्षक व लेखक द्वारकानाथ संझगिरी (Dwarkanath Sanzgiri) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. ते 74 वर्षांचे होते. क्रिकेटबद्दलचे त्यांचे लिखाण मराठी वाचकांमध्ये पसंत केले जाई. त्यांचा अंत्यविधी 7 फेब्रुवारी रोजी शिवाजी पार्क येथे होईल.
बातमी अपडेट होत आहे…
क्रिकेटची प्रचंड आवड असलेले संझगिरी पेशाने सिव्हील इंजिनीयर होते. मुंबई महानगरपालिकेतील उच्च पदावर नोकरी ते करत. मात्र, क्रिकेटवरील प्रेमाने ते लेखक आणि समीक्षक बनले. लेखक, समीक्षक, पत्रकार व मुलाखतकार अशा विविध रूपांमधून चाहते त्यांना पसंत करत.
संझगिरी यांनी अनेक नामवंत वृत्तपत्रांसाठी स्तंभलेखन केले. सामनामध्ये त्यांनी जवळपास 25 वर्ष स्तंभलेखन केलेले. तर सुरुवातीला त्यांचे षटकार हे पाक्षिक अत्यंत प्रसिद्ध झालेले. लेखक म्हणून एक नवी ओळख बनवताना त्यांनी विविध विषयांवरील तब्बल 44 पुस्तके लिहिली.
One comment
Pingback: Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score ।