Breaking News

पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ ठरला Maharashtra Kesari 2025 चा मानकरी, महेंद्र गायकवाड पुन्हा उपविजेता

MAHARASHTRA KESARI 2025
Photo Courtesy: X

Maharashtra Kesari 2025: अहिल्यानगर येथे आयोजित 67 व्या महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesari 2025) स्पर्धेत सोलापूरच्या पृथ्वीराज मोहोळ (Prithviraj Mohol) याने विजय मिळवला. अंतिम सामन्यात त्याने सोलापूरच्या महेंद्र गायकवाड पराभूत केले.

Mahendra Gaikwad Won Maharashtra Kesari 2025

गादी विभागातील वादग्रस्त अंतिम सामन्यानंतर पृथ्वीराज मोहोळ या अंतिम सामन्यात उतरला होता. तर, माती विभागात साकेत यादव याला पराभूत करून महेंद्र गायकवाड याने दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केलेला. संथ झालेल्या या अंतिम सामन्यात मोहोळ याने सुरुवातीला एक गुण घेतला. दुसऱ्या राउंडमध्ये गायकवाड हा देखील एक गुण घेण्यात यशस्वी ठरला. सामना संपण्यासाठी 16 सेकंद शिल्लक असताना मोहोळ याने गायकवाड याला बाहेर ढकलण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पंचांनी मोहोळ याच्या बाजूने एक गुण दिला. याला गायकवाड याने आक्षेप घेतला.

उर्वरित 15 सेकंदात गायकवाड याने कुस्ती खेळण्यास नकार दिल्याने पृथ्वीराज मोहोळ याला विजेता घोषित करण्यात आले.

(Prithviraj Mohol Won Maharashtra Kesari 2025)