
ENG vs IND Headingley Test Day 1 Highlights: भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा (India Tour Of England 2025) आजपासून (20 जून) सुरू झाला. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी भारतीय संघाने पूर्ण वर्चस्व गाजवले. कर्णधार शुबमन गिल (Shubman Gill) व सलामीवीर यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) यांनी ठोकलेली शतके पहिल्या दिवसाचे वैशिष्ट्य राहिले.
ENG vs IND Headingley Test Day 1 Highlights
A day to remember for India as Yashasvi Jaiswal and Shubman Gill get into the record books ✨#ENGvINDhttps://t.co/2RG0QkTbSz
— ICC (@ICC) June 20, 2025
– नाणेफेकीचा कौल जिंकत इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सचा गोलंदाजीचा निर्णय
– भारतीय संघासाठी फलंदाज साई सुदर्शन याचे कसोटी पदार्पण, भारतासाठी कसोटी खेळणारा 317 वा क्रिकेटपटू बनला साई
– यशस्वी जयस्वाल व केएल राहुल यांनी भारतीय संघाला 91 धावांची दिली सलामी
– पहिल्या सत्राच्या अखेरीस राहुल 42 व पदार्पणवीर साई सुदर्शन शून्यावर बाद, पहिल्या सत्राच्या शेवटी भारत 92-2
– दुसरे सत्र संपूर्णता भारताच्या नावे, यशस्वी जयस्वाल व कर्णधार शुबमन गिल यांची दुसऱ्या सत्रात 118 धावांची नाबाद भागीदारी
– यशस्वी जयस्वालने ठोकले कसोटी कारकिर्दीतील पाचवे शतक, तर शुबमन गिलचे नाबाद अर्धशतक, दुसऱ्या सत्राच्या शेवटी भारत 210-2
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
– सत्राच्या सुरुवातीला जयस्वाल 101 धावांची खेळी करून बाद, बेन स्टोक्सचा ठरला दुसरा बळी
– शुबमन गिल व उपकर्णधार रिषभ पंत यांची आक्रमक भागीदारी
– गिलने चौकार मारत पूर्ण केले कसोटी कारकिर्दीतील सहावे शतक, कर्णधार म्हणून पहिल्याच कसोटीत शतक
– रिषभ पंतच्या बॅटमधून निघाले अर्धशतक, कसोटीत पूर्ण केल्यात 3000 धावा
– दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारत 3 बाद 359, गिल नाबाद 127, पंत नाबाद 65
हे देखील वाचा: ENG vs IND: टीम इंडियाच्या इंग्लंड दौऱ्याचा आज शुभारंभ, वाचा पहिल्या कसोटीबाबत सर्वकाही
टेस्ट कॅप नंबर 317! Sai Sudarshan चे कसोटी पदार्पण, अशी राहिली आजवरची कारकीर्द
ENG vs IND: Headingley Test चा पहिला सेशन टीम इंडियाच्या नावे, यशस्वी-राहुलची 91 ची ओपनिंग
यशस्वीपाठोपाठ कॅप्टन Shubman Gill ही हेडिंग्लेचा हिरो! ठोकले 6 वे कसोटी शतक
One comment
Pingback: Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score ।