Breaking News

ENG vs IND: Headingley Test चा पहिला सेशन टीम इंडियाच्या नावे, यशस्वी-राहुलची 91 ची ओपनिंग

ENG VS IND
Photo Courtesy: X

ENG vs IND Headingley Test: इंग्लंड आणि भारत यांच्या दरम्यानच्या पहिल्या कसोटीत पहिल्या सत्रात भारतीय संघाने वर्चस्व गाजवले. मात्र, अखेरच्या दोन षटकात इंग्लंडने पुनरागमन केले. पहिला सत्राच्या अखेरीस भारतीय संघाने 2 बाद 92 अशी मजल मारली होती. 

ENG vs IND Headingley Test Day 1 Session 1

पाच सामन्यांच्या या मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. ताज्या खेळपट्टीवर गोलंदाजीला मदत मिळेल अशी अपेक्षा केली जात होती. मात्र, भारतीय सलामीवीर यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) व केएल राहुल (KL Rahul) यांनी इंग्लंडच्या गोलंदाजांना संधी दिली नाही. दोघांनी अत्यंत समर्थपणे भारतीय संघाचा डाव पुढे नेला.

इंग्लंडच्या काहीशा नव्या गोलंदाजी आक्रमणावर त्यांनी वर्चस्व गाजवले. दोघांची अर्धशतकी भागीदारी झाली. पहिल्या सत्रात दोघेही नाबाद जाणार असे वाटत होते. मात्र, सत्रातील शेवटून दुसऱ्या षटकात ब्रायडन कार्स याच्या चेंडूवर राहुल रूटच्या हाती झेल देऊन बाद झाला. त्याने 48 चेंडूत 42 धावा केल्या. त्याच्याजागी आलेल्या पदार्पणवीर साई सुदर्शन याला खाते देखील खोलता आले नाही. सत्रातील अखेरच्या षटकात तो बेन स्टोक्सच्या गोलंदाजीवर बाद झाला. भारताने पहिले सत्र संपताना 2 बाद 92 धावा बनवल्या होत्या. यशस्वी जयस्वाल नाबाद 42 धावा करून खेळत आहे.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

हे देखील वाचा: ENG vs IND: टीम इंडियाच्या इंग्लंड दौऱ्याचा आज शुभारंभ, वाचा पहिल्या कसोटीबाबत सर्वकाही

टेस्ट कॅप नंबर 317! Sai Sudarshan चे कसोटी पदार्पण, अशी राहिली आजवरची कारकीर्द