Breaking News

Yash Dayal Accused Of Sexual Harrasment: आरसीबीच्या युवा गोलंदाजावर महिलेचे गंभीर आरोप, थेट योगी आदित्यनाथांकडे मागितला न्याय, 5 वर्षांपासून…

YASH DAYAL ACCUSED OF SEXUAL HARRASMENT
Photo Courtesy: X

Yash Dayal Accused Of Sexual Harrasment: उत्तर प्रदेश व रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा युवा क्रिकेटपटू यश दयाल (Yash Dayal) हा चर्चेत आला आहे. एका महिलेने त्याच्यावर शारिरीक व मानसिक शोषण केल्याचा आरोप केला असून, थेट उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे न्यायची मागणी केली आहे. या महिलेने सोशल मीडिया पोस्ट करत, हे गंभीर आरोप केले.

Yash Dayal Accused Of Sexual Harrasment

उज्ज्वला सिंग (Ujjwala Singh) नामक महिलेने 14 जून रोजी पोलिस तक्रार दाखल केली आहे. यामध्ये तीने यश दयाल हा आपल्याला मागील पाच वर्षापासून ओळखत असून, त्याच्या कुटुंबीयांशी ओळख करून दिली होती. या दरम्यान त्याने आपले शारिरीक, आर्थिक व मानसिक शोषण केले. याविरोधात आवाज उठवल्यानंतर त्याने मारहाण केल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे.

यश याने इतरही मुलींना फसवले आहे. तसेच, पोलिसांत तक्रार केल्यानंतर पोलिसांनी काही कारवाई केली नसल्याचे तिने नमूद केले. त्यामुळेच थेट मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कार्यालयाकडे मदत मागितली आहे.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

 हे देखील वाचा: Smriti Mandhana T20I Century: स्मृतीने दाखवला क्लास, पहिल्या टी20 मध्ये झळकावले वादळी शतक