
Smriti Mandhana T20I Century vs England: इंग्लंड महिला विरुद्ध भारत महिला (ENGW vs INDW) यांच्यातील पहिला टी20 सामना ट्रेंटब्रिज येथे खेळला गेला. या सामन्यात स्मृती मंधाना (Smriti Mandhana) हिने समोरून भारतीय संघाचे नेतृत्व करत शानदार शतक झळकावले. तिने प्रकारच्या क्रिकेटमध्ये शतक पूर्ण करणारी ती पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू बनली.
Maiden T20I Hundred for Smriti Mandhana! 💯 👌
What a knock from the captain & what a way to bring it up in style 👏
Updates ▶️ https://t.co/iZwkYt7Crg#TeamIndia | #ENGvIND | @mandhana_smriti pic.twitter.com/Gv2Yar5R4z
— BCCI Women (@BCCIWomen) June 28, 2025
Smriti Mandhana T20I Century vs England
नियमित कर्णधार हरमनप्रीत कौर हिला विश्रांती दिल्याने या सामन्यात स्मृती भारतीय संघाचे नेतृत्व करत होती. प्रथम फलंदाजीची संधी मिळाल्यावर तिने यजमान संघाच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. तिने अवघ्या 51 चेंडूंमध्ये आपले पहिले टी20 शतक पूर्ण केले. हरमनप्रीतनंतर आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये शतक झळकावणारी ती दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली. यापूर्वी कोणत्याही भारतीय फलंदाजाला ही कामगिरी करता आलेली नाही. तर, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ही कामगिरी नोंदवणारी ती अवघी पाचवी फलंदाज आहे.
स्मृतीच्या आक्रमक खेळामुळे भारतीय संघाने इंग्लंड पुढे 211 धावांचे मोठे लक्ष ठेवले. बाद होण्यापूर्वी तिच्या बॅटमधून 62 चेंडूंमध्ये 15 चौकार व 3 षटकारांच्या मदतीने 112 धावा आल्या. स्मृती व्यतिरिक्त हरलीन देओल हिने 43 धावांचे योगदान दिले.
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
हे देखील वाचा: Yash Dayal Accused Of Sexual Harrasment: आरसीबीच्या युवा गोलंदाजावर महिलेचे गंभीर आरोप, थेट योगी आदित्यनाथांकडे मागितला न्याय
One comment
Pingback: Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score ।