
Ayush Shetty Won US Open Badminton 2025: भारताचा उदयोन्मुख बॅडमिंटनपटू आयुष शेट्टी याने ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे. अमेरिकेत झालेल्या युएस ओपन बॅडमिंटन 2025 स्पर्धेत त्याने विजेतेपद पटकावले. चालू वर्षी वर्ल्ड टूर फायनल जिंकणारा तो भारताचा पहिला पुरुष बॅडमिंटनपटू ठरला.
Ayush Shetty Won US Open Badminton 2025
यापूर्वीच अंतिम सामन्यात प्रवेश करून शेट्टी याने मोठी कामगिरी केली होती. अंतिम सामन्यात कॅनडाच्या ब्रायन यंग याला 21-18,21-13 असे सरळ गेममध्ये पराभूत केले. उपांत्य सामन्यात त्याने अव्वल मानांकित खेळाडूला मात दिलेली. शेट्टी सध्या केवळ वीस वर्षांचा आहे. वरिष्ठ स्तरावर खेळायला लागल्यापासून केवळ चारशे दिवसात त्याने आपले पहिले वर्ल्ड टूर टायटल जिंकले.
महिलांच्या एकेरीत भारताच्या सोळा वर्षीय तन्वी शर्मा (Tanvi Sharma) हिला पराभूत व्हावे लागले. अमेरिकेच्या अव्वल मानांकित बिवेन झॅंने तिच्यावर मात केली.
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
हे देखील वाचा: तन्वी शर्मा आणि आयुष शेट्टी US Open 2025 Badminton च्या फायनलमध्ये
One comment
Pingback: Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score ।