Breaking News

ब्रेकिंग! 2026 मध्ये सुरू होणार World Club Championship, या टी20 लीग विजेत्यांना मिळणार संधी, जय शहा…

world club championship
Photo Courtesy: X

World Club Championship In 2026: क्रिकेटप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. जगभरातील टी20 लीग विजेत्या संघांना घेऊन एक नवी लीग सुरू करण्याचा आयसीसीने विचार केला, असल्याचे सांगितले जाते. यापूर्वी झालेल्या चॅम्पियन्स लीग टी20 म्हणजेच सीएलटी20 (CLT20 Revived) चे पुनरूज्जीवन करून वर्ल्ड क्लब चॅम्पियनशिप पुढील वर्षी सुरु केली जाईल. आयसीसी चेअरमन जय शहा (Jay Shah) याल लीगसाठी आग्रही असल्याचे बोलले जातेय.

CLT20 Revived As World Club Championship In 2026

यापूर्वी 2009 मध्ये जगभरातील सर्व टी20 लीग विजेत्यांची मिळून चॅम्पियन्स लीग टी20 ही स्पर्धा आयोजित होत होती. अखेरच्या वेळी 2014 मध्ये चेन्नई सुपर किंग्सने ही स्पर्धा जिंकलेली. त्यानंतर आता अकरा वर्षापासून ही स्पर्धा खेळली गेलेली नाही. भारत, इंग्लंड व ऑस्ट्रेलिया या देशांनी पुढाकार घेत नव्याने ही लीग सुरू करण्याचा विचार केला आहे. ज्याला आयसीसी चेअरमन जय शहा यांनी देखील होकार दिल्याने समजते.

एका आघाडीच्या क्रिकेट संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील वर्षी ही स्पर्धा सुरू होईल. चॅम्पियन्स लीग टी20 चेच नामकरण वर्ल्ड क्लब चॅम्पियनशिप असे करण्यात येईल. यामध्ये आयपीएल, बिग बॅश लीग, द हंड्रेड व एसए टी20 लीग विजेत्यांना थेट प्रवेश मिळणार असल्याचे स्पष्ट आहे. यासोबतच या तीन स्पर्धांमधील उपविजेत्या संघाचा देखील स्पर्धेत स्थान दिले जाण्याची दाट शक्यता वर्तवली जातेय.

युएईतील इंटरनॅशनल लीग टी20, कॅरिबियन प्रीमियर लीग, न्यूझीलंडमधील सुपर स्मॅश, लंका प्रीमियर लीग, पाकिस्तान सुपर लीग व बांगलादेश प्रीमियर लीग या लीगमधील संघांना कशा पद्धतीने समाविष्ट केले जाईल, याबाबत विचार केला जाणार आहे.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

 हे देखील वाचा: भारतीय चाहत्यांना घाबरवतेय Edgbaston Test मधील टीम इंडियाची आकडेवारी, 58 वर्षात 8 वेळा भिडले आणि…