
ENG vs IND Edgbaston Test Day 3 Highlights: इंग्लंड आणि भारत (ENG vs IND) यांच्या दरम्यानची एजबॅस्टन कसोटी (Edgbaston Test) चांगलीच रंगात आली आहे. तिसऱ्या दिवसाच्या समाप्तीनंतर भारतीय संघाने एक मोठी आघाडी घेत, विजयाच्या दिशेने प्रयत्न सुरू केले आहेत. हॅरी ब्रूक (Harry Brook) आणि जेमी स्मिथ (Jamie Smith) यांची त्रिशतकी भागीदारी तिसऱ्या दिवसाचे वैशिष्ट्य ठरले.
Exciting day in Edgbaston sees India extend their lead beyond 200 runs 👌#WTC27 | #ENGvIND 📝: https://t.co/Av3A67xTry pic.twitter.com/ByDF23l7PT
— ICC (@ICC) July 4, 2025
ENG vs IND Edgbaston Test Day 3 Highlights
– इंग्लंडची तिसऱ्या दिवशी खराब सुरुवात
– दिवसातील दुसऱ्याच षटकात जो रूट व कर्णधार बेन स्टोक्स बाद
– सिराजने लागोपाठच्या चेंडूवर दोघांना पाठवले तंबूत
– इंग्लंडची 5 बाद 84 अशी दयनीय अवस्था
– सातव्या क्रमांकावर आलेल्या यष्टीरक्षक जेमी स्मिथने केले प्रतिआक्रमण
– ब्रूकने झळकावले मालिकेतील दुसरे अर्धशतक
– अवघ्या 80 चेंडूंमध्ये स्मिथने पूर्ण केले शतक
– लंचपर्यंत इंग्लंड 5 बाद 249
– दुसऱ्या सत्राचा खेळ सुरू होताच ब्रूकने घातली आपल्या नवव्या शतकाला गवसणी
– दुसऱ्या सत्रात भारतीय संघाच्या पदरात एकही यश नाही
– चहापानापर्यंत इंग्लंड 5 बाद 355 पर्यंत
– दिवसातील अखेरच्या सत्रात दोघांनी पूर्ण केली दीडशतके
– दुसरा नवा चेंडू घेतल्यावर भारतीय संघाला मिळाले यश
– हॅरी ब्रूक 158 धावा काढून बाद, इंग्लंड 6 बाद 387
– मोहम्मद सिराज याने अवघ्या 20 धावांत गुंडाळले शेपूट
– ख्रिस वोक्स 5 तर कार्स, टंग व बशीर खाते ही न खोलता बाद
– स्मिथ 207 चेंडूंमध्ये 184 धावा काढून नाबाद
– इंग्लंड 407 धावांमध्ये सर्वबाद, भारताला 180 धावांची आघाडी
– सिराजचे सर्वाधिक सहा तर आकाश दीपचे चार बळी
– दुसऱ्या डावात भारताची आक्रमक सुरुवात
– जयस्वाल व राहुलने दिली 7.4 षटकात 51 धावांची सलामी
– जयस्वाल 22 चेंडूमध्ये 28 धावा काढून बाद
– दिवसाचा खेळ संपला तेव्हा राहुल 28 तर नायर 7 धावांवर नाबाद
– दुसऱ्या डावात भारत 1 बाद 64, भारताची आघाडी 244 धावांची
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
हे देखील वाचा: ENG vs IND Edgbaston Test Day 2: ‘शुबमन शो’नंतर गोलंदाजांचा कहर, वाचा Day 2 च्या सर्व हायलाईट्स
ENG vs IND Edgbaston Test Day 1: गिलने जिंकल दिल! वाचा Day 1 च्या सर्व हायलाईट्स