
Jasprit Bumrah On Lords Honours Board: इंग्लंड आणि भारत (ENG vs IND) यांच्या दरम्यान लॉर्ड्स (Lords Test) येथे तिसरा कसोटी सामना खेळला जात आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी दुसऱ्या सत्रात भारताने इंग्लंडचा पहिला डाव 387 धावांवर संपवला. भारतासाठी अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याने सर्वाधिक पाच बळी मिळवले. यासह त्याने लॉर्ड्सच्या ऑनर्स बोर्डवर (Lords Honours Board) आपले नाव नोंदवले.
FIFER for Jasprit Bumrah 🫡
His maiden five-wicket haul at Lord's in Test cricket 👏👏
Updates ▶️ https://t.co/X4xIDiSUqO#TeamIndia | #ENGvIND | @Jaspritbumrah93 pic.twitter.com/AfyXq9r6kD
— BCCI (@BCCI) July 11, 2025
Jasprit Bumrah On Lords Honours Board
इंग्लंडचा आपला तिसरा दौरा खेळत असलेल्या बुमराहने या सामन्यात शानदार गोलंदाजी केली. सामन्याच्या पहिल्या दिवशी त्याने हॅरी ब्रूकचा बळी मिळवला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी खेळ सुरू होताच पहिल्या तीन षटकातच त्याने बेन स्टोक्स, जो रूट व ख्रिस वोक्स यांचे बळी मिळवले. त्यानंतर दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीलाच जोफ्रा आर्चर याचा बळी मिळवत त्याने पाच बळी पूर्ण केले. त्याने 27 षटकात 74 धावा देत आपले पंचक मिळवले. (Latest Cricket News)
लॉर्ड्स मैदानावर शतक ठोकणाऱ्या फलंदाजाचे आणि पाच बळी मिळवणाऱ्या गोलंदाजाचे नाव ऑनर्स बोर्डवर लिहिले जाते. भारतासाठी पाच बळी मिळवून या बोर्डवर येणारा बुमराह 12 वा गोलंदाज ठरला. मोहम्मद निसार यांनी भारताच्या पहिल्याच दौऱ्यावर ही कामगिरी नोंदवली होती. त्यानंतर अमर सिंग, लाला अमरनाथ व रमाकांत देसाई यांनी देखील हा मान मिळवला. भारताचे माजी कर्णधार कपिल देव, चेतन शर्मा व व्यंकटेश प्रसाद यांनी देखील लॉर्ड्सवर एका डावात पाच बळी टिपले. आरपी सिंगने 2007, प्रवीण कुमारने 2011, भुवनेश्वर कुमार व इशांत शर्माने 2014 व यावर्षी जसप्रीत बुमराहने ही कामगिरी करून दाखवली.
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
हे देखील वाचा: ENG vs IND: जस्सीचा बकरा बनलाय रूट! हा रेकॉर्ड आता बुमराहच्या नावावर