Breaking News

Jannik Sinner बनला विम्बल्डन 2025 चा बादशाह! अल्कारेझचे साम्राज्य खालसा

jannik sinner
Photo Courtesy: X

Jannik Sinner Won Wimbledon 2025: वर्षातील तिसरी ग्रॅंडस्लॅम स्पर्धा असलेल्या विम्बल्डन 2025 चा अंतिम सामना रविवारी (13 जुलै) खेळला गेला. या अंतिम सामन्यात अव्वल मानांकित यानिक सिन्नर याने द्वितीय मानांकित कार्लोस अल्कारेझ (Carlos Alcaraz) याचा चार सेटमध्ये पराभव करत आपले पहिले विम्बल्डन विजेतेपद पटकावले. यासह अल्कारेझ याचे विम्बल्डन हॅट्रिकचे स्वप्न भंग पावले.

Jannik Sinner Won Wimbledon 2025

महिनाभरापूर्वी फ्रेंच ओपन अंतिम सामन्यात हे दोन्ही खेळाडू आमनेसामने आले होते. यामध्ये अल्कारेझ याने एक ऐतिहासिक विजय मिळवलेला. या अंतिम सामन्यात देखील अल्कारेझ याने 6-4 असा सहज पहिला सेट खिशात घातला. त्यामुळे तो विजेतेपदाची हॅट्रिक करणार, असे बोलले जाऊ लागले.

मात्र, सिन्नर याने आपल्यावरील सर्व दबाव झुगारून देत 6-4,6-4-6-4 असे सहज पुढील तीनही सेट जिंकून विम्बल्डन विजेतेपदाला गवसणी घातले. सिन्नर याने वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या पहिल्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये देखील विजेतेपद पटकावले होते. वर्षातील अखेरच्या युएस ओपनमध्ये कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

हे देखील वाचा: Iga Swiatek बनली Wimbledon 2025 ची राणी! अवघ्या 32 मिनिटांत अनिसिमोवाची शरणागती