
Indian Football Team New Head Coach: भारतीय फुटबॉल संघाला लवकरच नवा प्रशिक्षक मिळणार आहे. अखिल भारतीय फुटबॉल महासंघ (AIFF) यांनी नव्या मुख्य प्रशिक्षकाच्या काढलेल्या जाहिरातीसाठी उदंड प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता नव्या प्रशिक्षकाच्या निवडीसाठी तयार केलेल्या समितीने तीन नावे अंतिम केली आहेत. त्यापैकी एकाच्या हातात भारतीय फुटबॉलची जबाबदारी दिली जाईल.
AIFF Technical Committee shortlists three for Blue Tigers head coach role 🇮🇳
More details 🔗 https://t.co/lPFcNPaznF#IndianFootball ⚽️ pic.twitter.com/xYBRBhvp4P
— Indian Football Team (@IndianFootball) July 23, 2025
Three Names Shortlisted For Indian Football Team New Head Coach Post
भारतीय संघाच्या सततच्या खराब कामगिरीनंतर मनेलो मार्केझ यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर महासंघाने नव्या मुख्य प्रशिक्षकांसाठी जाहिरात सार्वजनिक केली होती. या पदासाठी 100 पेक्षा जास्त प्रशिक्षकांनी अर्ज केलेले. यामध्ये अनेक दिग्गजांचा समावेश होता. मात्र, अखेर केवळ तीन नावांवर शेवटच्या फेरीसाठी शिक्कामोर्तब केले गेले आहे. ऍंटोनियो लोपेझ हबास, सर्जिओ लोबेरो व रॉबी फावलर असे नामांकित प्रशिक्षक या यादीमध्ये जागा बनवण्यात अपयशी ठरले.
दोन वेळा भारतीय फुटबॉल संघाचे माजी प्रशिक्षक राहिलेल्या स्टिफन कॉन्स्टेनटाईन (Stephen Constantine) यांना पुन्हा एकदा महासंघाने संधी देण्याबाबत विचार सुरु केला आहे. त्यांच्याच मार्गदर्शनात भारताने 2002-2005 व 2015-2019 या कालावधीत उत्कृष्ट कामगिरी केली होती. भारतीय क्रिकेटचे ज्ञान असलेल्या व प्रचंड अनुभवी कॉन्स्टेनटाईन यांच्याकडे भारतीय फुटबॉलला निराशेच्या गर्तेतून बाहेर काढण्याचा फॉर्मुला असू शकतो.
महासंघ ज्या नावासाठी सर्वाधिक आग्रही असल्याचे समजते आहे ते नाव भारतीय फुटबॉल प्रशिक्षक खालिद जमील (Khalid Jamil) यांचे आहे. भारतीय फुटबॉलशी जवळून संबंध असल्याने व एशियन कपच्या दृष्टीने त्यांची निवड होऊ शकते. अनेक भारतीय फुटबॉलपटूंनी देखील त्यांच्या नावाला दुजोरा दिल्याचे सांगितले जात आहे. नजीकच्या काळात नॉर्थ ईस्ट युनायटेड व जमशेदपूर एफसी या दोन आयएसएल क्लबचे मुख्य प्रशिक्षक म्हणून त्यांनी काम पाहिले असून, या पदावर पोहोचणारे ते एकमेव भारतीय प्रशिक्षक आहेत.
कॉन्स्टेनटाईन व जमील यांच्या व्यतिरिक्त भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदाच्या शर्यतीत स्लोवाकियाचे स्टीफन तारकोविक (Stefan Tarkovic) हे देखील आहेत. मोठ्या कालावधीसाठी मुख्य प्रशिक्षक बनवायचे झाल्यास महासंघ तारकोविक यांच्या नावाचा विचार करेल. त्यांच्याकडे स्लोवाकिया व किर्गिझस्तान या दोन देशांच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा अनुभव आहे.
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
हे देखील वाचा: Top Five OCI Footballers: हे पाच OCI खेळाडू बदलू शकतात भारतीय फुटबॉलचा वर्तमान, 2030 फिफा वर्ल्डकप लक्ष्य