Breaking News

Joe Root ने ओल्ड ट्रॅफर्डवर लिहिला नवा इतिहास! आता नंबर 1 बनण्याकडे घौडदौड

joe root
Photo Courtesy: X

Joe Root Become 2nd Highest Run Getter In Test History: इंग्लंड आणि भारत (ENG vs IND) यांच्या दरम्यान मँचेस्टर (Manchester Test) येथील ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर चौथा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यातील पहिल्या डावात इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रूट याने लाजवाब दीडशतकी खेळी केली. यादरम्यान त्याने कसोटी इतिहासातील दुसरा सर्वाधिक धावा बनवणारा फलंदाज होण्याचा मान मिळवला.

Joe Root Become 2nd Highest Run Getter In Test History

ओल्ड ट्रॅफर्ड येथे खेळल्या जात असलेल्या या सामन्यात रूटकडे आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा बनवण्याच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर जाण्याची संधी होती. सामना सुरू होण्यापूर्वी तो या यादीत 13,259 धावांसह पाचव्या स्थानी होता. मात्र, त्याने पहिल्या डावात शानदार 150 धावा करत त्याने दुसऱ्या स्थानी मजल मारली. रूटने सुरुवातीला 13,288 धावा करत भारताच्या राहुल द्रविड याला मागे टाकले. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या जॅक कॅलिस याचा 13,289 धावांचा विक्रम मोडीत काढला.‌

रूटने आपल्या खेळी दरम्यान 38 वे कसोटी शतक पूर्ण केले. त्यानंतर 120 वी धाव काढत त्याने रिकी पॉंटिंग याचा 13,378 धावांचा विक्रम मागे सोडला. आता रूट कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. रूटने 157 कसोटीच्या 286 डावांमध्ये 51.17 च्या सरासरीने 13,409 धावा केल्या आहेत. या यादीमध्ये त्याच्यापुढे आता केवळ भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर असून, सचिनने आपल्या कारकीर्दीत 200 कसोटी सामने खेळताना 15,921 धावा केल्या होत्या. रूटकडे हा विक्रम मोडण्याची संधी असेल.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

हे देखील वाचा:  ENG vs IND Manchester Test Day 3: इंग्लंडची टीम इंडियावर कुरघोडी, वाचा Day 3 च्या सर्व हायलाईट्स