Breaking News

तब्बल 4 बदलांसह इंग्लंड खेळणार Oval Test, भारताकडे मालिका बरोबरीत आणण्याची सुवर्णसंधी

oval test
Photo Courtesy; X

England Made Four Changes For Oval Test: इंग्लंड विरुद्ध भारत (ENG vs IND) कसोटी मालिकेतील अखेरचा कसोटी सामना गुरुवारपासून (31 जुलै) खेळला जाईल. इंग्लंडच्या ओव्हल मैदानावर हा सामना खेळला जाईल. या सामन्यासाठी इंग्लंडने आपली प्लेईंग इलेव्हन (England Playing XI) जाहीर केली. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स (Ben Stokes) दुखापतीमुळे या सामन्यासाठी उपलब्ध नसेल.

England Made Four Changes For Oval Test

पाच सामन्यांच्या मालिकेतील चार सामन्यानंतर इंग्लंडने 2-1 अशी आघाडी घेतली. पाचव्या सामन्यात विजय मिळवून मालिका जिंकण्याची संधी त्यांच्याकडे असेल. मात्र, या सामन्यात इंग्लंड प्रमुख चार खेळाडूंविना उतरेल. सलग दोन सामन्यात सामनावीर ठरलेला कर्णधार बेन स्टोक्स दुखापतीमुळे या सामन्यात दिसणार आहे. तर, वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर, ब्रायडन कार्स व फिरकीपटू लियाम डॉसन यांना देखील विश्रांती देण्यात आली.

दुसरीकडे भारताकडे मालिका बरोबरीत आणण्याची सुवर्णसंधी असेल. भारतीय संघात जसप्रीत बुमराह याच्या जागी अर्शदीप सिंग याची वर्णी लागू शकते. तसेच, दुखापतग्रस्त रिषभ पंतच्या जागी ध्रुव जुरेल याचे खेळणे निश्चित आहे. फिरकीपटू कुलदीप यादव याला संधी मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष असेल.

ओव्हल कसोटीसाठी इंग्लंडची प्लेईंग इलेव्हन- झॅक क्राऊली, बेन डकेट, ओली पोप (कर्णधार), जो रूट, हॅरी ब्रूक, जेकब बेथल, जेमी स्मिथ (यष्टीरक्षक), जेमी ओव्हरटन, जोन टंग, ख्रिस वोक्स व गस ऍटकिन्सन.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

हे देखील वाचा: भारतीय फलंदाजांनी घेतली इंग्लंडची शाळा! Manchester Test ड्रॉ