
ENG vs IND Oval Test Day 1 Highlights: इंग्लंड आणि भारत यांच्या दरम्यानच्या अखेरच्या कसोटी सामन्याला गुरुवारी (31 जुलै) सुरुवात झाली. पावसाच्या व्यत्ययामुळे जवळपास एका सत्राचा खेळ वाया गेला. इंग्लंडने पहिल्या दिवशी भारताला 6 बाद 204 असे रोखत, दिवस आपल्या नावे केला. भारतासाठी अनुभवी करूण नायर (Karun Nair) याने नाबाद अर्धशतक ठोकले.
That's Stumps on Day 1 of the 5th #ENGvIND Test! #TeamIndia end the rain-curtailed opening Day on 204/6.
We will be back for Day 2 action tomorrow. ⌛️
Scorecard ▶️ https://t.co/Tc2xpWMCJ6 pic.twitter.com/VKCCZ76MeG
— BCCI (@BCCI) July 31, 2025
ENG vs IND Oval Test Day 1 Highlights
– इंग्लंडचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय
– भारतीय कर्णधार शुबमन गिलने पाचही सामन्यात गमावली नाणेफेक
– दोन्ही संघात प्रत्येकी चार बदल
– केवळ दहा धावांवर भारताला बसला पहिला धक्का, जयस्वाल 2 धावा करून बाद
– फॉर्ममधील राहुलचा वोक्सने 14 धावांवर उडवला त्रिफळा
– पावसामुळे थांबला खेळ
– पुन्हा खेळ सुरू झाल्यावर कर्णधार गिल 21 धावांवर धावबाद
– सामन्यात पुन्हा एकदा पावसाचा व्यत्यय
– साई सुदर्शन 38 व रवींद्र जडेजा 9 धावांवर बाद, जोश टंगने मिळवले दोन्ही बळी
– दौऱ्यातील पहिला सामना खेळत असलेला ध्रुव जुरेलही केवळ 19 धावा करू शकला
– करुण नायर व वॉशिंग्टन सुंदर यांनी केली नाबाद अर्धशतकी भागीदारी
– करूणने पूर्ण केले कारकिर्दीतील पहिले अर्धशतक, तब्बल 9 वर्षानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये उंचावली बॅट
– दिवसाचा खेळ संपताना भारत 6 बाद 206, करूण 52 तर सुंदर 19 धावा काढून नाबाद
– इंग्लंडसाठी ऍटकिन्सन व टंगचे प्रत्येकी दोन बळी
– पहिल्या दिवशी झाला केवळ 64 षटकांचा खेळ
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
हे देखील वाचा: तब्बल 4 बदलांसह इंग्लंड खेळणार Oval Test, भारताकडे मालिका बरोबरीत आणण्याची सुवर्णसंधी
One comment
Pingback: Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score ।